ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
वाशीतील फॅन्टासिया पार्क मधील अग्निसुरक्षा बंद
मॉल, बिझनेस पार्कची अग्निसुरक्षा रामभरोसे
नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या फॅन्टासिया बिझनेस पार्क या इमारतीत अग्नीशमन यंत्रणा बंद असल्याचे तसेच तेथील अग्निशमन उपकरणे रिफिलींग केले नसल्याचे अग्निशमन विभागाने केलेल्या तपासणीत आढळून आले आले. त्याचप्रमाणे या सोसायटीने अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखल्याचे नुतनीकरण देखील केले नसल्याने आढळून आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने वाशी येथील फॅन्टासिया बिझनेस पार्क प्रिमायसेस सहकारी संस्थेला नोटीस बजावून पुढील दोन महिन्यात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन फॅन्टासिया बिजनेस पार्कची अग्निसुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.
वाशी, सेक्टर-३० ए रेल्वे स्टेशन परिसरात रघुलीला, इनऑर्बिट आणि फॅन्टासिया बिजनेस पार्क असे नागरिकांची वर्दळ असलेले मॉल आणि बिझनेस सेंटर आहेत. शहरात आगीच्या घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीने नागरिकांची वर्दळ असलेल्या इमारतींची (जागेची) तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाशी, सेक्टर-३०ए मधील भूखंड क्रमांक-४७ वर सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक हावरे यांनी फॅन्टासिया बिजनेस पार्क इमारत उभारली आहे. या इमारतीतील सर्व दुकाने आणि गाळ्यांची विक्री करण्यात आली आहे. मात्र, या इमारतीमध्ये महापालिकेच्या नगररचना विभागाने मंजूर केलेल्या नकाशापेक्षा मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, भविष्यात आगीची घटना घडू नये तसेच त्यामुळे होणारी जीवितहानी टळावी यासाठी नवी मुंबई महापालिकेने नागरिकांची वर्दळ असलेल्या जागा, मॉल, दुकाने आदिंची अग्निसुरक्षा तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अग्निशमन विभागाने वाशीतील फॅन्टासिया बिजनेस पार्कच्या अग्निसुरक्षेची तपासणी केली असता, तेथील स्थायी अग्नीशमन यंत्रणा बंद असल्याचे आढळून आले आहे. तसेच तेथील अग्निशमन उपकरणे रिफिलींग केले नसल्याचे त्याचप्रमाणे आग विझविण्यासाठी असलेले पंप देखील बंद स्थितीत असल्याचे आढळून आले आहे.
या सोसायटीने अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखल्याचे नुतनीकरण केले नसल्याने तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाचे वाशी केंद्र अधिकारी अरुण भोईर यांनी वाशीतील फॅन्टासिया बिजनेस पार्क प्रिमासेस सहकारी संस्थेला नोटीस बजावली आहे. तसेच पुढील दोन महिन्यात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वीत करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.