महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
ठाणे पोलिसांच्या रेजींग डे मध्ये विद्यार्थ्याचे प्रबोधन
विद्यार्थ्यांना दिली विविध शस्त्रास्त्रांची माहिती
ठाणे : पोलिस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी याकरिता ठाणे पोलिसांच्यावतीने अभिनव शक्कल लढविण्यात आली आहे.विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यप्रणाली आणि हत्याराची माहिती व्हावी, या उद्देशाने ठाणे नगर पोलीस ठाण्यात बुधवारी रेझिंग डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस स्कूलच्या ५० विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात आणून शस्त्रांस्त्राविषयी सखोल माहिती देण्यात आली.
ठाणे पोलिसांच्या रेजींग डे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बुधवारी ठाणे पोलिसांनी ठाणे पोलिस दलाकडे उपलब्ध असलेल्या जुन्या रायफलपासून अत्याधुनिक एके ४७ सारख्या अनेक शस्त्रांची माहितीही यावेळी देण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्याना पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तर सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेले वाहतुकीचे नियम, अंमली पदार्थांच्या सेवनाचे आरोग्यावर आणि जीवनावर होणारे घातक परिणाम याविषयी माहिती देण्यात आली. ठाणे पोलिसांची कार्यप्रणाली, सर्वसामान्यांना न्यायदनाची प्रक्रिया अडीची माहिती विद्यार्थ्यांना अवगत करून देत पोलिसांची प्रतिमा उंचवावी यादृष्टीने एक आगळावेगळा प्रयत्न या रेजिंग डे निमित्ताने केला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली.