एक धाव अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी!

 
कामोठे मॅरेथॉन स्पर्धेत विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ धावपटुंचा सहभाग
कामोठे : ‘छाबा फाऊंडेशन, कामोठे'तर्फे २४ डिसेंबर रोजी रामशेठ ठाकूर स्कूलच्या प्रांगणात ‘कामोठे मॅरेथॉन स्पर्धा-२०२३'चे आयोजन करण्यात आले होते. एक धाव अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी या उदात्त हेतूने आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेला धावपटुंचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

‘कामोठे रन'मध्ये पनवेल नवी मुंबई मधील सुमारे एक हजार शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांसोबत १८ वर्षाच्या पुढील वयोगटापासून ते ६० वर्षावरील ज्येष्ठ धावपटुंचा देखीलचा देखील समावेश होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून २ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि १० किलोमीटर मॅरेथान स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते पनवेल, नवी मुंबई परिसरातील २०० अनाथ मुलामुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, कामोठे शहर भाजपा अध्यक्ष रविंद्र जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, डॉ. अरुण कुमार भगत, युवा नेते हॅपी सिंग, सुशील शर्मा, हर्षवर्धन पाटील, सर्व हर्जंदर कौर, रमेश तुपे, भाऊ भगत, तेजस जाधव, जयकुमार दिघोळे, सागर ठाकरे, सुरेंद्र हळळीकर, आदि उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी 'छाबा फाऊंडेशन'चे पदा 

 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

 ‘नमो खारघर मॅरेथॉन' ला उदंड प्रतिसाद; १९,६०१ स्पर्धक धावले