आरक्षित भुखंडावरील अनधिकृत ४ मजली इमारतीवर तोडक कारवाई

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील आय प्रभागातील अडवली ढोकळी येथील शाळेसाठी आरक्षित असलेल्या भुखंडाच्या जागेवर अनाधिकृतपणे बांधलेली ४ मजली इमारत भुईसपाट करण्याचा बडगा उगारीत प्रशासनाने तोडक कारवाई सुरु केली.

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी अडवली ढोकळी येथील शाळेसाठी आरक्षित भुखंडावर अनाधिकृतपणे उभारण्यात आलेल्या ४ मजली बांधलेल्या इमारतीचे पाडकाम २३ मार्च रोजी सुरू केले. या कारवाईमुळे आरक्षित भुखंडावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांना धसका बसला आहे. ही कारवाई महापालिका पोलीस कर्मचारी, अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि २ डंपर, १जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘पलेमिंगो सिटी'ची ओळख वाचवा, पाणथळ जागा संरक्षित करा