खारघर मध्ये काही मोजवयाच ठिकाणी गटारे साफसफाई

खारघर : खारघर वसाहत मधील गटारे माती, कचरा यांनी तुडुंब भरली आहेत. मात्र, पनवेल महापालिका द्वारे काही मोजक्याच ठिकाणी   गटारे साफसफाई केली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे .

खारघर वसाहतीत खारघर सेक्टर-१२ सर्वात मोठा नोड आहे. विशेष म्हणजे खारघर सेक्टर-१२ मध्ये ‘सिडको'ने बीयुडीपी योजना अंतर्गत २४, २८ आणि ३२ मीटर उंचीच्या चाळी उभारल्या आहेत. बैठ्या चाळीत एकावर एक तीन-तीन मजले उभारण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खारघर सेक्टर-१२ मधील गटारे अरुंद असून, या परिसरात बांधकामासाठी रस्त्यावर ठेवली जाणारी रेती, खडी आणि प्लास्टिक कचरा गटारात  जावून गटारे तुडुंब भरली आहेत. साफसफाई केलेल्या जागेत कचरा रस्त्यावर पडून आहे. एप्रिल - मे महिन्यात गटारांची साफसफाई करणे आवश्यक असताना पनवेल महापालिकाकडून मे  महिन्यात गटारांची साफसफाई करण्यासाठी एजन्सीची निवड करण्यात आल्यामुळे आजही खारघर मधील अनेक सेक्टर मधील नाल्यांची साफसफाई झाली नसल्याचे चित्र दिसते. या संदर्भात पनवेल महापालिका उपायुक्त (आरोग्य विभाग) डॉ. वैभव विधाते आणि अभियांत्रिकी विभाग अधिकारी अनिल कोकरे यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही.

पनवेल महापालिका तर्फे खारघर आणि तळोजा वसाहत मधील नाले आणि गटारे साफसफाईचे कंत्राट एकाच एजन्सीला देण्यात आले आहे. सदर एजन्सीच्या नावाविषयी खारघर आणि नावडे विभाग कार्यालयात विचारणा केली असता, आरोग्य आणि अभियात्रिकी विभागाने एजन्सीचे नाव उघड करु नये अशी तंबी स्थानिक महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

खारघर सेक्टर-१२ मधील गटारांची साफसफाई करण्याची कामे झालेली नाहाती. गटारे तुडुंब भरली आहेत. पहिल्याच पावसात  खारघर सेक्टर-१२ मधील गोखले शाळा मागील बाजूस असलेल्या   एफ टाईप मध्ये काही मोजक्याच ठिकाणी गटारांची साफसफाई करण्यात आली असून, पनवेल महापालिका अधिकाऱ्यांना संपर्क केल्यास ते माहिती देण्यास टाळाटाळ करतात. - अविनाश निकम, रहिवाशी तथा युवा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी  - रायगड  जिल्हा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 एपीएमसी आवारातील सर्व इमारती धोकादायक