मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सायकल रॅली
पनवेल : पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी वसुंधरा अभियान ४.०' अंतर्गत पर्यावरणपूरक जीवनशैलीचा नागरिकांनी स्वीकार करावा याविषयी वडाळे तलाव येथे जनजागृतीपर सायकल रॅली आयोजित करण्यात आली.
यावेळी महापालिकेचे सहायक आयुक्त स्वरुप खारगे, घनकचरा-आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, प्रभाग अधिकारी रोशन माळी, ‘पनवेल सायकलिंग क्लब'चे अरुण खेडवाल, महापालिका अधिकारी-कर्मचारी, बायसिकल मेयर सुधीर चाकोले, ‘रनथॉन सायकलिंग क्लब'चे प्रमुख पुरणसिंग, ‘रोटरी क्लब ऑफ पनवेल'चे सदस्य उपस्थित होते.
पर्यावरणपूरक जीवनशैलीचा नागरिकांनी स्वीकार करावा. तसेच घनकचरा व्यवस्थापन, मलनिःस्सारण व्यवस्थापन, माझी वसुंधर अंतर्गत येणाऱ्या पंचतत्वाचे जतन करण्याचा संदेश ‘सायकल रॅली'च्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी ‘माझी वसुंधरा'ची शपथ घेण्यात आली.
पर्यावरण विभाग उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सुचनेनुसार स्वच्छ पर्यावरणास हातभार लावण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक जीवनशैली महत्वची ठरते. सदर संदेश सर्वत्र पोहोचविणे, असा या ‘सायकल रॅली'चा उद्देश होता. ‘सायकल रॅली'ची सुरुवात पनवेल मधील वडाळे तलाव येथून झाली. वडाळे तलाव, गार्डन हॉटेल, प्राचिन हॉस्पिटल, जुना ठाणा नाका रोड -ओव्हरहेड टैंक, पनवेल महापालिका मुख्यालय, स्वामी नित्यानंद रोड, पनवेल सिव्हील कोर्ट, विरुपाक्ष मंगल कार्यालय आणि वडाळे तलाव असा या ‘सायकल रॅली'चा मार्ग होता. यामध्ये ४०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. सहभागी सायकलस्वारांना महापालिकेच्या वतीने टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या ‘सायकल रॅली'मध्ये लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला.