म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
नवी मुंबई भाजपातर्फे जितेंद्र आव्हाडांविरोधात जोडे-मारो आंदोलन
नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर फाडणारे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नवी मुंबई जिल्हा भाजपातर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जळजळीत निषेध आंदोलन करण्यात आले.
नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनामध्ये माजी महापौर सागर नाईक यांच्यासह दशरथ भगत, सतीश निकम, संपत शेवाळे, नवीन गवते, अमित मेढकर, राजू शिंदे, विविध मोर्चाचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. आव्हाड यांच्या प्रतिमेला चपलांचे जोडे मारून त्यांचे पोस्टर फाडून त्यांचा निषेध करण्यात आला.
कोणत्याही गोष्टीची स्टंटबाजी करणे ही आव्हाड यांची जुनी सवय आहे. आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी महामानवाचा अपमान करणाऱ्या आव्हाडांच्या कृतीचा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करतो आहे, असा हल्लाबोल जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केला. डॉ. आंबेडकरांनी देशाला समता आणि बंधुतेचा विचार दिला. आव्हाडांना राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आपण काय करतोय याचे भान राहिले नाही. बाबासाहेबांचे पोस्टर फाडून त्यांनी अक्षम्य असा गुन्हा केला आहे. त्यांच्या पोटातलं कृतीत उतरलं आहे.
ऐतिहासिक अशा महाडमध्ये आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडून त्यांचा अवमान केला, अशी टीका नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी केली. आव्हाड यांचे विचार सकारात्मक नसून नकारात्मक आहेत. त्याच्यात राजकीय स्वार्थ दिसून येतो, असे सांगितले.