मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
‘सपा'च्या पदाधिकाऱ्यांचा ‘शिवसेना'मध्ये प्रवेश
नवी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि सर्व धर्मियांना एकत्र घेऊन चालण्याच्या समानतेच्या धोरणावर विस्वास ठेवून ‘समाजवादी पार्टी'च्या तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मधील नवी मुंबईतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ‘शिवसेना'मध्ये जाहीर प्रवेश केला. ‘समाजवादी पार्टी'चे नवी मुंबई अध्यक्ष सलीम मुल्ला, एम. एच. खान, अब्दुल शेख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या उपस्थितीत ‘शिवसेना'मध्ये प्रवेश केला. तसेच ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'चे सानपाडा येथील उपशहरप्रमुख शिरीष पाटील, जोतीराम भालेकर भगत राजेश जुईनगरचे शाखा प्रमुख स्वानंद शिंदे, युवा सेना बेलापूर विधानसभा पदाधिकारी विनायक धनावडे, महिला शाखा संघटक सुनीता भोसले यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह ‘शिवसेना'मध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे नेरुळ येथील ‘वंचित बहुजन आघाडी'चे सिध्दार्थ साळवी यांनी देखील कार्यकर्त्यांसह ‘शिवसेना'चे धनुष्यबाण हाती घेतले.
१० फेब्रुवारी रोजी नेरुळ, सेक्टर-१५ येथे सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये नवी मुंबईत शिल्लक ‘सना'मध्ये एकही कार्यकर्ता शिल्लक राहणार नाही. जे कार्यकर्ते त्या ठिकाणी राहिले आहेत ते सर्वच आमच्या संपर्कात असून काहीच दिवसात ते देखील आपल्याकडे येतील, असे विजय नाहटा यांनी सांगितले.
याप्रसंगी महिला जिल्हा संघटक सौ. सरोज पाटील, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत आगोंडे, दिलीप घोडेकर, दीपक सिंग, रामाशेठ वाघमारे, माजी नगरसेवक तथा सहसंपर्क प्रमुख ज्ञानेश्वर सुतार, शिवसेना उत्तर भारतीय सेनाचे जिल्हा संघटक कमलेश वर्मा, उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव, शहर प्रमुख विजय माने, उपशहर प्रमुख संतोष मोरे, आतिष घरत, महेश परब तसेच ‘युवा सेना'चे उपजिल्हाप्रमुख साईनाथ वाघमारे तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन नेरुळ विभाग सहसंपर्क प्रमुख संजय भोसले यांनी केले होते.