तळवली, गोठिवली मधील ३ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका घणसोली विभाग कार्यक्षेत्रातील तळवली, गोठिवली मधील ३ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई महापालिका अतिक्मण विभागातर्फे करण्यात आली.  

नवी मुंबई महापालिका घणसोली विभाग कार्यक्षेत्रातील रबाळे, तळवली सेवटर-२२ मधील रेशनिंग दुकानाच्या पाठीमागे रघुनाथ बाळकृष्ण पाटील (घरमालक) आणि बळीराम पांडूरंग पाटील (विकासक) यांनी, गोठिवली सेवटर-३०डी मधील गजानन अपार्टमेंट शेजारी, शंकर मंदिर रोड लगत  पुरुषोत्तम बाबू पाटील (घरमालक आणि विकासक) यांनी तसेच गोठिवली सेवटर-३०डी मधील शंकर मंदिर रोड लगत अलका भगवान पाटील (घरमालक) आणि गणेश परशुराम पाटील (घरमालक-विकासक) यांनी नवी मुंबई महापालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस महापालिका घणसोली विभाग कार्यालय मार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. नोटीस नंतर संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यासाठी महापालिका घणसोली विभाग कार्यालय (अतिक्रमण विभाग) तर्फे अनधिकृत बांधकाम निष्कासन मोहिमेचे आयोजन १९ मार्च रोजी करण्यात आले होते. या मोहिमेत सदर अनधिकृत बांधकाम २ पोकलेन मशिन्स, १ जेसीबी, १ ब्रेकर आणि २५ कामगारांच्या साहाय्याने पुर्णतः निष्कासित करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिका उपायुवत (अतिक्रमण) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनान्वये या धडक मोहिमेसाठी महापालिका सहाय्यक आयुक्त (मुख्यालय) डॉ.अजय गडदे,  घणसोली विभाग सहाय्यक आयुक्त संजय तायडे, कनिष्ठ अभियंता रोहित ठाकरे, कनिष्ठ अभियंता राज नागरगोजे तसेच घणसोली, तुर्भे, बेलापुर आणि कोपरखैरणे विभागातील महापालिका अधिकारी-कर्मचारी, पोलीस पथक तैनात होते.

दरम्यान, यापुढे देखील नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे महापालिका उपायुवत (अतिक्रमण) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले. 

 

--

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भारतीय नववर्ष स्वागत यात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी