मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
पनवेल महापालिका तर्फे भव्य मिरवणूक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
पनवेल : छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात, ढोल-ताशाच्या गजरात पनवेल महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने लोकसहभागातून १९ फेब्रुवारी रोजी पनवेल शहरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक संचालक (नगररचना) ज्योती कवाडे , मुख्य लेखा-वित्त अधिकारी मंगेश गावडे, माजी नगरसेवक, मुख्य अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, महापालिका अधिकारी-कर्मचारी, महापालिका शाळांचे विद्यार्थी, पनवेल शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन ढोल-ताशाच्या गजरात भव्य अशा मिरवणुकीला सुरूवात झाली. या मिरवणुकीमध्ये पारंपारिक वेशभूषेमधील महिला, सीकेटी विद्यालय, रामशेठ ठाकूर इंग्लीश मिडीयम स्कूल यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रांतील विविध प्रसंगाचे दोन चित्ररथ, महापालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, ढोल पथक, बॅन्जो पथक यांचा समावेश होता.
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याजवळून निघालेली सदर मिरवणूक हुतात्मा स्मारक चौक, आदर्श लॉज, लाईन आळी, लोकनेते दि. बा. पाटील प्राथमिक शाळा, गांवदेवी मंदिर, स्वा. सावरकर चौक, बापटवाडा चौक, महापालिका मुख्यालय, सेवा योजन कार्यालय, बंदर रोड चौक, मौलाना आझाद चौक या मार्गाने निघूनटपाल नाका येथे आली. येथील अर्धाकृती छत्रपती शिवाजी महाराज अर्ध पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीची सांगता झाली.
यानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मान्यवर, विद्यार्थी, नागरिक एकत्रित येताच छत्रपती शिवाजी महारांजाच्या जय घोषाने अवघे नाट्यगृह दुमदुमले. अशा भारलेल्या वातावरणामध्ये अंगावरती शहारा आणणाऱ्या पहाडी आवाजामध्ये राहूल सोनावणे यांनी आपल्या साथीदारांसमवेत पोवाडा सादर केला. यानंतर मिरवणुकीतील लेझीम पथकांना आणि चित्ररथांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी ‘गार्गी ग्रुप'च्या महिला पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग अत्यंत सुंदररित्या सादर केले. महापालिका उपायुक्त कैलास गावडे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे विभाग प्रमुख दशरथ भंडारी यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.
शिवजयंती उत्सव स्पर्धा विजेतेः
लेझीम स्पर्धा- मनपा शाळा क्र.८ (प्रथम), मनपा शाळा क्र.६ (द्वितीय), लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय (तृतीय).
चित्ररथ स्पर्धा- चांगू काना ठाकूर-नवीन पनवेल (प्रथम), लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्वुÀल ॲण्ड ज्युनियर कॉलेज-कामोठे (द्वितीय).