१०-१० तास वेटींग करुनही तिकीटाची नो-गॅरंटी

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा का होते नाही? ते त्यांच्या पक्षाला विचारावे. पण, सध्याचा ट्रेंड पाहता घोषणा झाल्यानंतरही पत्ते कापले जातात. यामुळे कदाचित ते सावध भूमिकेत घेत असतील. त्यांच्या बाबतीत असे होऊ नये. निवडणूक काळात वारंवार सर्व्हे होत असतात. ‘भाजपा'चे सुध्दा सर्व्हे होतात. शिंदे गटाच्या खासदारांचे निगेटिव्ह सर्व्हे आल्यामुळे कदाचित त्यांची तिकीटे कापली जात आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा सुध्दा निगेटिव्ह सर्व्हे आला असेल म्हणून घोषणा होत नसेल, अशी टीका शिवसेना ठाकरे गट ‘युवा सेना'चे सचिव  वरुण सरदेसाई यांनी डोंबिवली येथे केली.

‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ४ एप्रिल रोजी त्यांच्या निवासस्थानी निवडणुकीच्या कामकाजाविषयी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. सदर बैठकीस कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, माजी नगरसेवस्क रमेश जाधव, वैशाली दरेकर यांच्यासह शिवसेना आणि युवा सेनाचे पदाधिकारी उपस्थिती होते. यावेळी ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवार वैशाली दरेकर यांना वरुण सरदेसाई यांनी शुभेच्छा दिल्या.

सदर नियतीचा खेळ आहे. ज्या १३ खासदारांनी ‘शिवसेना'ला सोडले, त्यांच्यामुळे सत्ता गेली, पक्षामध्ये फुट पडली त्या १३ खासदारांपैकी ५ खासदारांचे भाजपा आणि आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट कापले आहे. आता त्यांना उध्दव ठाकरे यांची आठवण येत असेल, असे बोलून वरुण सरदेसाई यांनी शिंदे गटातील नाराज नेत्यांना टोला लगावला.

२०१४ ते २०१९ काळात या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून स्वतः ठाकरे कुटुंब उपस्थित असायचे. रश्मी वहिनी औक्षण करुन यांना एबी फॉर्म द्यायच्या. आता परिस्थिती वेगळी आहे. १०-१० तास वेटींग करावे लागत असूनही त्यानंतर देखील तिकीट मिळत नाही. मातोश्रीवर मिळणारा मान आणि आत्ताचे त्यांचे स्थान असे चित्र सगळ्यांना कळून चुकले आहे. शिवसेना आम्ही पुढे घेऊन जाणार असे म्हणणाऱ्यांना २ आकडी जागा मिळवता येत नाही. पण, ‘महाविकास आघाडी'मध्ये उध्दव ठाकरे यांनी २१ उमेदवारांची घोषणा केली, असे वरुण सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

वाशी टोल नाक्यावर दुहेरी लूट