वयाच्या ७४ मध्ये माजी विद्यार्थ्यांची सहल

उरण : महालणसभा विद्यालय फुंडेच्या माजी विद्यार्थ्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षीही पंढरपूर सहलीला जाऊन आनंद घेतला.

सन १९६६/६७ ला ११वी मध्ये असणारे सदर विद्यार्थी मागील ४३ वर्षापासून विविध तिर्थक्षेत्रांना जाऊन सहलीचा आनंद घेत आलेले आहेत. एकाच वर्गातील ५६ विद्यार्थ्यांमधील आजही असलेले ३३ विद्यार्थी आजही आपल्या पत्नी आणिजवळच्या नातेवाईकांसह सहलीला जात असतात. आजपर्यतच्या आठवणींना उजाळा देणे, आपल्या दिवंगत झालेल्या वर्ग मित्र-मैत्रिणींना श्रध्दांजली वाहणे, हिशोब घेणे आणि पुढील सहलीचे आयोजन केले जाते. पुढील सहल माजी विद्यार्थी नर्मदा गंगाधर म्हात्रे, सिता दत्ता कडू, विमल महेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे.

पंढरपूर येथील सहलीत पंचायतन नढाळ, महड, देहू, आळंदी, पंढरपूर आणि जेजुरी या तिर्थक्षेत्रांचे या माजी विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले. जयवंत पाटील, धनाजी, भोईर, महादेव घरत, भालचंद्र धरत, एल. बी. पाटील, काशिनाथ ठाकूर, पांडुरंग घरत या ज्येष्ठ मित्रांनी सहलीचेसुरेख नियोजन केले. त्यांना भूषण ठाकूर, महेंद्र ठाकूर, कैलास ठाकूर, निलेश या तरुणांनी मोठे सहकार्य केले. विनोद म्हात्रे यांनी सहलीत पौराणिक कथांचा आनंद दिला. जयवंत पाटील, बी. ई. घरत यांनी झालेल्या बैठकीत मार्गदर्शनपर विचार मांडून आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' उपक्रमाचे चौथे सत्र संपन्न