टेम्स टेक्नॉलॉजी व ब्रेन गेम्स

नवी मुंबई : वाशीतील रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवारी पार पडलेल्या स्टेम शक्ती टेक फेस्ट या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स, ए-आर, व्ही-आर, कॉसमो फ्लेंच, सुमो फाईट, गेमिंग ऍफ्स, पॉकेट कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर ऍफ्स अशा विविध विषयांवर प्रतिकृती सादर करुन आपले कौशल्य दाखवुन दिले. या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृती व प्रयोगांचे सर्वांनीच कौतुक केले.  

वाशीतील रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवारी लर्निंग लिंक्स फाउंडेशन व 360 वन वेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम शक्ती टेक फेस्ट 2023-24 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुबंई, रायगड,नवी मुबंई व इतर जिह्यातून एकूण 40 हून अधिक विद्यालयांनी सहभाग घेतला होता. या फेस्ट मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून तांत्रिक व वैज्ञानिक दृष्टीकोन वापरुन रोबोटिक्स, ए-आर, व्ही-आर, कॉसमो फ्लेंच, सुमो फाईट, गेमिंग ऍफ्स, पॉकेट कॉम्फ्युटर आणि सॉफ्टवेअर ऍफ्स अशा विविध विषयांवर प्रतिकृती तयार करुन त्याचे सादरीकरण केले होते.  

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या प्रदर्शशनाला रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, संस्थेचे सदस्य दशरथ भगत, 360 वन वेल्थ फाउंडेशनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष गुरुप्रताप सिंग, व्यवस्थापक मर्दव गाला, लर्निंग लिंक्सचे वरिष्ठ व्यवस्थापक सचेत सनल, उपाध्यक्ष एम.डी.खमरोद्दीन, मॉडर्न स्कुलच्या प्राचार्या सुमित्रा भोसले आणि पर्यवेक्षक, शिक्षक तसेच परिसरातील सर्व शाळेतील विदयार्थी, पालकांनी भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध प्रयोग व प्रतिकृतींचे कौतुक केले.  


टेम्स टेक्नोलॉजीतील लक्षवेधी प्रयोग  
या स्पर्धेमध्ये महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक प्रतिकृती तयार केली होती. ही प्रतिकृती रिमोटद्वारे चालविली जात असून त्यांचे इलेक्ट्रॉड पॅड्स शरीराच्या विविध जागेवर लावल्याने विद्युत तरंग निर्माण होऊन  त्यामुळे आराम मिळत असल्याचा प्रयोग तसेच बाईक कार-जुन्या दुचाकीच्या इंजिनाचा वापर करुन बनविलेल्या कारने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये मुलांनी टाकाऊ दुचाकी गाडीच्या विविध भागांपासून एक तीन चाकी कार तयार केली होती.  

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिका शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेतील सर्व घटकांना पूर्वीची अट कायम