श्री शनि मंदिर येथे महिलांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त जनसेवा महिला मंडळ नेरुळ यांच्या माध्यमातून नेेरुळ, सेवटर-११ मधील श्री शनि मंदिर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि हळदी-कुंकू कार्यक्रम ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी माजी नगसेविका अनिता शेट्टी, माजी नगरसेविका सरस्वती पाटील, जयेश थोरवे, सोनाली बनकर, जयश्री चित्रे, ज्योती पाटील, प्रियांका म्हात्रे, वनिता गडदे, भवर सिंग, ‘जनसेवा महिला मंडळ'च्या पदाधिकारी-सदस्या तसेच विभागातील शेकडो महिला उपस्थित होत्या.

‘जागतिक महिला दिन'च्या अनुषंगाने जमसेवा महिला मंडळ तसेच माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांच्या माध्यमातून सदर महिला मेळावाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला. यावेळी महिलांची ओटी भरुन त्यांना आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून वाण देण्यात आले. त्यानंतर महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले. 

महिलांच्या आरोग्यासाठी रोज सकाळी योगा करण्यात यावा, त्याद्वारे आपले आरोग्य निरोगी ठेवता येईल. शेट्टी आणि आम्ही ३० वर्ष सोबत काम केले आहे. प्रत्येक कार्यक्रमात बोलवून ते मान-सन्मान देत असतात. महिलांनी स्वतःची ताकद निर्माण केली पाहिजे. आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. महिलांनी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहील पाहिजे. सध्याचे स्पर्धेच युग असून या स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर सतत काम केल पाहिजे. महिलांनी सर्वप्रथम स्वतःचे रक्षण करायला हवे, अन्याय अत्याचार विरोधात लढा द्यायला शिका. चूल आणि मूल नुसते न बघता व्यवसायाच्या माध्यमातून सक्षमीकरण करायला हवे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

तसेच माजी नगसेविका अनिता शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विचार लक्षात घेऊन  भारतीय जनता पार्टी पक्ष निवडला गेला आहे. आम्ही ‘भाजपा'मध्ये त्यांचे मनापासून स्वागत करतो, असेही आमदार सौ. म्हात्रे म्हणाल्या. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

विद्यापीठ उपकेंद्र की निवडणूक कार्यालय?