बस चालवताना चालकाकडून मोबाईलचा वापर?

वाशी : वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे धोकादायक असून, त्यामुळे जीवघेणा अपघात घडू शकतो, अशी वारंवार सूचना देण्यात येते. वाहतुक पोलिसांकडून वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई देखील करण्यात येते. मात्र, अनेकदा या नियमांचे उल्लंघन होताना सर्रासपणे दिसते.त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा नवी मुंबई शहरात आला आहे.

‘नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम'च्या (एनएमएमटी) नेरुळ स्थानक ते उलवे बामणडोंगरी या १७ नंबर मार्गावर धावणाऱ्या बस मधील चालक चक्क बस चालवत असताना ‘मोबाईल फोन'चा वापर करीत असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे बस चालकाच्या या प्रकाराने बस मधील प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

दरम्यान, बस चालकाने केलेल्या या प्रकाराची दखल घेऊन सबंधित बस चालकाला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती ‘नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम'चे व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी दिली. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

जप्त वाहनांचे सुटे भाग चोरणाऱ्याला अटक