ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सॅटीस पुलाजवळ अज्ञात बॅग; उडाली खळबळ
ठाणे : ठाणे स्थानकाच्या पश्चिम भागात असलेल्या सॅटीस ब्रीज जवळी शिवाजी पथ येथे बेवारस सापडलेल्या बॅगमुळे बॉम्ब ठेवल्याची अफवा १८ जानेवारी रोजी दुपारी वाऱ्यासारखी पसरली. या घटनेने घटनास्थळी ठाणे शहर पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी येऊन बेवारस बॅगेची तपासणी केली असता त्या बॅगेमध्ये पोलिसांना काही आक्षेपार्ह आढळले नाही. यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
ठाणे (पश्चिम) शिवाजी पथ येथील सॅटीस पुलाच्या लगत १८ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे पोलिसांसह बॉम्बशोध पथकाने तातडीने पोहोचून बेवारस बॅगेची तपासणी केली. मात्र, बॅगेमध्ये कपडे वगळता काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. अखेर ती अफवा ठरल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
दरम्यान, सध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरु आहे. याअंतर्गत ठाणे शहरातही विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. त्यामुळे सदर बेवारस बॅगेमुळे काही काळासाठी खळबळ उडाली.