मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
मालमत्ता गुन्हे शाखेची कारवाई
ठाणे : नवीमुंबई परिसरात राहणाऱ्या आणि प्राणघातक शस्त्र विक्रीसाठी ठाण्यात आलेल्या आरोपी नागेश सिध्दू मठ (२४) याला मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून मंगळवारी(ता-२३) रोजी अटक केली. त्याच्या अंग झडतीत पोलीस पथकाला अग्निशस्त्र आणि दोन जिवंत काडतूस हस्तगत केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
अटक आरोपी नागेश सिध्दू मठ(२४) रा.नामदेवनगर, व्दारकाबाई चाळ, रूम नं. ४००, दिघा बावा मंदीराजवळ, दिघा नविमुंबई यांच्याबाबत मालमत्ता गुन्हे शाखा युनिटच्या पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार आरोपी नागेश्वर पोलीस पथकाने लक्ष केंद्रित केले. तो कळवा विटावा परिसरात येणार असलायची माहिती मिळाली. पोलिसांनी मालवन स्वाद हॉटेलचे समोर, विटावा ठाणे बेलापुर रोड, ठाणे या ठिकाणी सापळा लावुन आरोपीस अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे अग्निशस्त्र, दोन जिवंत काडतुसे आणि मॅगेझीन हस्तगत केली. रबाळे पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तो सराईत गुन्हेगार असलायची माहिती पोलिसांनी दिली. मालमत्ता गुन्हे शाखा अधिक तपस करीत आहेत.