ऐरोली सेक्टर-1 मधुन दिड लाखांचा गुटख्याचा साठा जप्त 

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गत शनिवारी रात्री ऐरोली सेक्टर-1 मधील एका घरावर छापा मारुन विक्रीकरीता साठवुन ठेवलेला सुमारे दिड लाख रुपये किंमतीचा गुटखा, सुगंधीत पान मासाला व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे. तसेच सदर गुटखा व पान मसाल्याचा साठा करुन ठेवणा-या आशिशकुमार गुप्ता (23), धिरजकुमार गुप्ता (28) व राहुलकुमार गुप्ता या तिघांना अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने आता या तिघांना गुटखा व पान मसाल्याचा पुरवठा करणा-या पुरवठादारांचा शोध सुरु केला आहे.    

 ऐरोली सेक्टर-1 मधील न्यु.इंग्लीश स्कुलच्या पाठामागील खोली नं.1495 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा विक्री करण्यासाठी अवैधरित्या साठवणूक करुन ठेवण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप मोरे व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री 9 वाजण्याच्य सुमारास ऐरोली सेक्टर-1 मधिल संशयीत घरावर छापा मारला.  

यावेळी सदर घरामध्ये 9 गोण्यांमध्ये भरुन ठेवण्यात आलेला सुमारे दिड लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसल्याचा साठा आढळुन आला त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदर गुटख्याचा साठा जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी सदर गुठख्याचा साठा करुन ठेवणा-या आशिशकुमार गुप्ता, धिरजकुमार गुप्ता व राहुलकुमार गुप्ता या तिघांसह त्यांचा मालक त्रिभुवन कश्यप या चौघांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कस्टम व सायबर क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून महिलेकडुन उकळली 1 लाखांची रक्कम