मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
नवी मुंबई पोलीस दलातील ८ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहिर
नवी मुंबई : महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल राज्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचा-यांना तसेच उल्लेखनीय प्रशंसनीय कार्य करणा-या पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक, पोलीस पदक आणि पोलीस शौर्य पदकासह पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात येते. त्याअनुषंगाने सन २०२३ या वर्षातील उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्रातील तब्बल ८०० पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना पोलीस महासंचालकांचे पदक (सन्मानचिन्ह) जाहिर झाले आहे. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ८ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे.
पोलीस महासंचालकांचे पदक जाहिर झालेल्यांमध्ये नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल दगडू सापते, पोलीस हवालदार संदीप मनोहर ढवळे, गिरीष रामचंद्र किंद्रे, सतीश दत्तात्रय साळुंखे, गिरीष विनायक चौधरी, कृष्णा जयराम गावीत आणि दत्तात्रय किसन भगत यांचा समावेश आहे. या सर्वांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कळंबोली येथे पोलीस मुख्यालय येथे होणा-या पथसंचालनावेळी या पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. पोलीस महासंचालकांचे पदक जाहिर झालेल्या या पोलीस अधिकारी कर्मचा-यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे