आयुवत अजिज शेख यांच्या हस्ते नगररचना सहा. संचालक खोब्रागडे कुटुंबाचा सन्मान
उल्हासनगर ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्रात सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आणि अनेक रेकॉर्डची नोंद करणाऱ्या उल्हासनगर महापालिकेतील नगररचना विभागाचे सहा. संचालक नगररचना ललित खोब्रागडे आणि त्यांची पत्नी अर्चना खोब्रागडे यांच्या नागपूर मधील ‘बोधी फाऊंडेशन'च्या कार्याची दखल घ्ोऊन महाराष्ट्र शासनाकडून त्यांचा नुकताच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत कुमार भांगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल आणि २५ हजाराचा धनादेश देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याबद्दल ३ एप्रिल रोजी उल्हासनगर महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्या हस्ते सहा. संचालक ललित खोब्रागडे, त्यांची पत्नी आणि मुलगी यांना गौरविण्यात आले.
आयुक्त अजिज शेख यांनी खोब्रागडे दाम्पत्याने सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याचा गौरव करुन त्यांचे कौतुक केले. यावेळी सहा. संचालक ललित खोब्रागडे आणि अर्चना खोब्रागडे यांनी आपल्या खडतर आयुष्याचे अनुभव सांगून आपला जीवनप्रवास सर्वांसमोर मांडला.
सदर सत्कार समारंभ प्रसंगी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त किशोर गवस, डॉ. सुभाष जाधव, मोहिनी धर्मा, वैद्यकीय अधिकारी, ‘वर्ल्ड बुध्दीष्ठ सर्कल'चे संचालक प्रदीप जगताप, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, उपलेखा अधिकारी निलम कदम, सिस्टम ॲनलिस्ट श्रध्दा बाविस्कर, सहा. आयुक्त गणेश शिंपी, मनिष हिवरे, दत्तात्रय जाधव, विभाग प्रमुख अंकुश कदम, अच्युत सासे, विशाखा सांवत, राजा बुलानी, नितेश रंगारी यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.