‘निर्णय तुमचाच जबाबदारीही तुमचीच'

ठाणे : ‘निर्णय तुमचाच जबाबदारीही तुमचीच' या संदेशासह ठाणे मधील टिपटॉप प्लाझा येथे ‘ठाणे शहर वाहतूक शाखा'तर्फे ‘रस्ता सुरक्षा अभियान-२०२४'चा शुभारंभ ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आला.

‘ठाणे शहर वाहतूक शाखा'च्या वतीने शुभारंभ करण्यात आलेला ‘रस्ता सुरक्षा अभियान' १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत साजरा होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी रस्ता सुरक्षेचे महत्व आणि वाहतूक नियमांचे पालन करणे, आदि संदेशासह ‘निर्णय तुमचाच जबाबदारीही तुमचीच' या ब्रीद वाक्यासह एका व्हिडोओचे अनावरण करण्यात आले.

‘रस्ता सुरक्षा अभियान'मध्ये रस्ता सुरक्षेचा संदेश नागरिकांपर्यंत परिणामकारक पोहोचण्यासाठी विविध शाळा, कॉलेज या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेमधून पोलीस आणि नागरिक यांच्यामधील संवाद अधिक दृढ व्हावा तसेच रस्ता सुरक्षेबाबत सर्व नागरिकांनी अधिक जागरुक आणि दक्ष रहावे, असा उद्देश आहे.

‘रस्ता सुरक्षा अभियान'च्या वतीने करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान'च्या शुभारंभ प्रसंगी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, सह-पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) महेश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सॅटीस पुलाजवळ अज्ञात बॅग; उडाली खळबळ