फ्लेमिंगो निवासस्थानाला प्लास्टीकचा धोका

नवी मुंबई : नेरुळ येथील डीपीएस पलेमिंगो तलावात १ जून रोजी स्वच्छता मोहिमेदरम्यान तब्बल ४५० किलो कचरा, त्यातील बहुतांश प्लास्टिक गोळा करण्यात आला. 

५ जून रोजी होणाऱ्या ‘जागतिक पर्यावरण दिन'पूर्वी, ‘डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ'च्या क्लायमेट ॲक्शन लॅबने (डी-सीएएल), रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई, ‘जॉय ऑफ गिव्हींग'च्या सहकार्याने सदर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई महापालिकाने पर्यटकांच्या सोयीसाठी डस्टबीन ठेवला आहे. ‘धरती की आवाज' या थीमवर आधारित या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणीय कारभारीकडे अधिक सखोल, अधिक सजग दृष्टिकोनाला प्रेरित करणे हा आहे, असे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमात डी. वाय. पाटील विद्यापीठचे ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

राजलक्ष्मी पाटील यांनी स्थापन केलेली, डी-सीएलएल विद्यार्थ्यांचा सहभाग आणि समुदाय-समावेशक कृतींना प्रोत्साहन देऊन हवामान बदलाचा सामना करण्यासाठी समर्पित आहे. 

स्वच्छता मोहिमेला नवी मुंबई महापालिका, वन विभाग, एनआरआय पोलीस ठाणे, मॅन्ग्रोव्ह सेल तसेच एनएमईपीएस आणि एनव्हायर्नमेंटल लाईफ, आदि विविध प्राधिकरण-संस्थांनी पाठिंबा दिला. नवी मुंबई एनव्हायर्नमेंट प्रिझर्वेशन सोसायटीचे संदीप सरीन आणि अनुपम वर्मा, एन्व्हायर्नमेंट लाइफचे धर्मेश बाराई यांनी तलाव परिसर स्वच्छ करण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी संस्थांना मार्गदर्शन केले. 

दरम्यान, सदर मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात देवी-देवतांच्या नॉन-बायोडिग्रेडेबल मूर्ती गोळा करण्यात आल्या. त्या सर्व डी. वाय. पाटील यांच्या इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन अँड क्रिएटिव्हिटी या संस्थेकडे नुतनीकरणासाठी पाठवण्यात आल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल तालुक्यातील १४ गावे दरडग्रस्त