ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
खा. राजन विचारे यांच्याकडून विविध कामांची पाहणी
नवी मुंबई : खासदार राजन विचारे यांनी सततच्या पाठपुराव्याने केलेल्या नवी मुंबई मधील कामांचे ७ मार्च रोजी लोकार्पण आणि पाहणी केली. त्यामध्ये ऐरोली-कळवा एलिव्हेटेड या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पाहणीेवेळी ईश्वरनगर परिसरातील नागरिकांसाठी रेल्वे मार्गाखाली उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे खा. विचारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी खासदार विचारे यांच्यासह रेल्वे, सिडको आणि महापालिकेचे अधिकारी, जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, महेश कोटीवाले, माजी नगरसेवक एम. के. मढवी, करण मढवी, विजयनंद माने, रवींद्र म्हात्रे, किशोर गायकर, जगदीश गवते, विभाग प्रमुख विनायक पवार, उपशाखा प्रमुख सुरेश पवार, शशिकांत पार्टे, कळवा विभागातील शहरप्रमुख चंद्रकांत विधाटे, उपशहर प्रमुख मुकुंद ठाकूर, शाखाप्रमुख राजकिरण तळेकर, दिनेश ठाकूर, जगदीश पाटील, चंद्रकांत मयेकर, अनिकेत कांबळे तसेच शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्यावेळी खा. राजन विचारे यांनी ‘एमएमआरडीए' मार्फत उभारण्यात येत असलेल्या ऐरोली-कटाई मार्गाची पाहणी केली. सदर रस्ता डोंगर भागातून भुयारी मार्ग काढून बनविण्यात येत असून फक्त १५ मिनिटात ऐरोली ते कटाई गाठता येणार आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिकांना सदर मार्ग सुखकर होणार आहे.
घणसोली येथील पर्यटकांना आकर्षित करणारे गवळीदेव स्थान पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे काम खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांमुळे महापालिका मार्फत हाती घेण्यात आले आहे. खासदार विचारे यांनी तत्कालीन पर्यटन-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्याकडे केलेल्या मागणी नुसार पर्यटन विभागाने ५ कोटींचा निधी महापालिकेला गवळीदेव परिसर विकसित करण्याकरिता दिला आहे. त्यामध्ये नेचर ट्रायल (गवळीदेव स्थळापर्यंत जाणारा मार्ग) परिसर सुशोभीकरण करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय व्यवस्था, निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमी यांना पाहण्यासाठी बैठक व्यव्यस्था करणे, तसेच मुख्य प्रवेशद्वाराचे पूर्ण करण्यात आली आहेत. यावेळी उर्वरित कामाचा शुभारंभ करण्यात आला.
गेली १४ वर्ष ‘सिडको'ने अपूर्ण अवस्थेत ठेवलेल्या ऐरोली-घणसोली रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी खा. विचारे यांनी सिडको आणि महापालिकेकडे पाठपुरावा करून या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध केला आहे. त्यानुसार एलिव्हेटेड उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी एकूण ५४० कोटी मंजूर आहेत. त्यापैकी नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांच्या अनुदानातून उभारण्यात येणारा ३.४७ किलोमीटरचा पुल ऐरोली-कटाई नाका मार्गिकेला जोडण्यात येणार आहे. या कामाची त्यांनी पाहणी केली.
पलेमिंगो पक्षी पाहण्याकरिता पर्यटकांची गर्दी ऐरोली येथे होत असल्याने खा. राजन विचारे यांनी कांदळवन विभागाकडून सागरी जैवविविधता केंद्राच्या विकासासाठी ३० कोटीची मान्यता मिळवली असून त्यातील पहिल्या टप्प्यात १० कोटींचे काम यावर्षी सुरु होत आहे. त्यामध्ये जेट्टीची व्यवस्था करुन कांदळवन वाटिका उद्यान आणि म्युझियम उभारण्यात येणार असल्याने या कामाची सुरुवात करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली
याशिवाय गोठिवली गांव मैदान, वाशी रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पुल, ‘एनएमएमटी'च्या इलेक्ट्रिक बसेस, पामबीच मार्गावरील सायकल ट्रॅक, आदि कामांचीही खासदार विचारे यांनी पाहणी केली.