कासवाला जीवनदान !

उरण: मच्छी पकडण्याच्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला करंजा कोंढरी पाडा येथील भारत हिराजी पाटील आणी त्यांच्या सहकाऱ्यांनी समुद्राच्या पाण्यात पुन्हा सोडून जीवनदान दिले आहे.

करंजा गावातील कोंढीपाडा येथील भारत पाटील आणि त्यांचे सहकारी नेहमी प्रमाणे समुद्रात आपली बोट घ्ोऊन मासेमारी करण्यासाठी गेले होते. २६ डिसेंबर रोजी त्यांनी खोल समुद्रात मासेमारी करणारे जाळे टाकले असता, त्यांच्या जाळ्यात समुद्रातील मोठाले कासव अडकून पडले होते. सदर बाब भारत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास येताच तत्काळ त्यांनी जाळ्यात अडकलेले कासव बाहेर काढून त्याला पुन्हा समुद्रात सोडून दिले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

देशातील पहिला मध महोत्सव मुंबईत