नवी मुुंबईमध्ये मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण सुरु

नवी मुंबई : ‘महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग'मार्फत २३ जानेवारी पासून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्यव्यापी विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून सर्वेक्षणाकरिता ११००हुन अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सदरचे सर्वेक्षण कालबध्द रितीने अचूकरित्या पूर्ण करण्यासाठी पर्यवेक्षकांचे आणि प्रगणकांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले असून या सर्वेक्षणासाठी शासनाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या विशेष ॲपवर गृहभेटी देऊन माहिती संकलित करण्यास सुरुवात झालेली आहे.

‘राज्य मागासवर्ग आयोग'च्या निर्देशानुसार सर्वेक्षणाचे काम २३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात येत असून या सर्वेक्षणासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ११००हुन अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वेक्षणासाठी कर्मचारी महापालिका क्षेत्रात गृहभेटी देणार असून शासनाने दिलेल्या विहित नमुन्यात माहिती संकलित करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरी माहिती संकलित करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचूक माहिती द्यावी आणि संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना मज्जाव