एपीएमसी फळ बाजारात जुन्नर मधील केशर आंबा दाखल  

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जुन्नर मधील हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात होते. त्यापाठोपाठ जुन्नर मधीलच केशर आंबा दाखल होण्यास सुरुवात होत असून, ४ जून रोजी एपीएमसी फळ बाजारात २ गाड्या दाखल झाल्या आहेत. या आंब्याला ४० ते ८० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम सर्वात मोठा हंगाम असून, तो मे महिन्यापर्यंत चालतो.यंदा मात्र मे महिन्यात कोकण हापूस आंब्याचा हंगाम  लवकरच कमी होऊन कर्नाटक आंब्याची आवक वाढली होती. दुसरीकडे एपीएमसी फळ बाजारात मे अखेरीस जुन्नर हापूस आंब्याचा हंगाम सुरु झाला झाला असून, आता जुन्नर केशर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. एपीएमसी फळ बाजारात ४ जून रोजी जुन्नर केशर आंब्याच्या २ गाड्या दाखल झाल्या असून, १० जून नंतर केशर आंबा आवक वाढेल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. सध्या केशरी आंबा प्रति किलो ४० ते ८० रुपये दराने विक्री होत आहे. केशर आंबा चवीला अधिक गोड असल्याने इतर आंब्यांच्या तुलनेत केशर आंब्याला मागणी जास्त असते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 जागतिक पर्यावरण दिन निमित्त आंबा कोयी संकलित करण्यासाठी विशेष वाहने सज्ज