ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
गुढीपाडवा मुहूर्तावर ९५ हजार पेट्या हापूस आंबा आवक
वाशी : हिंदू वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा!. गुढीपाडवा सण वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस. गुढीपाडवा सण हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा दिवशी साडेतीन मुहूर्तपैकी एक मुहूर्त असल्याने नागरिक नवीन वस्तू खरेदीवर भर देतात. याशिवाय गुढीपाडवा मुहूर्तावर आंबा खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होत असते.त्यामुळे वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात गुढीपाडवा मुहूर्तावर विक्रमी अशी ९५,२४० हापूस आंबा पेट्यांची आवक झाली आहे.
वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात मागील काही दिवसांपासून हापूस आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. एपीएमसी फळ बाजारात आवक जरी वाढली असली तरी हापूस आंबा दर मात्र अजूनही स्थिर आहेत. वातावरणात उष्मा वाढल्याने आंब्याची तोडणी लवकर केल्याने एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याची आवक वाढत आहे. ८ एप्रिल रोजी गुढीपाडवा मुहूर्तावर एपीएमसी फळ बाजारात देवगड, रत्नागिरी मधून ६७,०९६ तर इतर राज्यातील २८,१४४ मिळून एकूण ९५,२४० हापूस आंबा पेट्या दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, एपीएमसी फळ बाजारात आवक जरी वाढली असली तरी साधारण हापूस आंबा पेटीला २००० ते २५०० रुपये तसेच उच्च प्रतीच्या हापूस आंबा पेटीला ३००० ते ४००० रुपये दर आहे. एपीएमसी फळ बाजारात येत्या दिवसात हापूस आंबा आवक अजून वाढणार असून, हापूस आंबा दर आणखी खाली उतरतील, अशी माहिती एपीएमसी फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.
--