महावाचन उत्सवात 5 हजाराहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी अधोरेखित केले पुस्तकांचे महत्व
‘महायुती'तील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न
नवी मुंबई : ‘ठाणे लोकसभा मतदारसंघ'मधील ‘महायुती'च्या घटक पक्षांतील सर्व पदाधिकाऱ्यांची आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी संयुक्त बैठक पार पडली. याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यासह ‘शिवसेना (शिंदे गट)'चे उपनेते विजय नाहटा, जिल्हा संघटक सौ. सरोज पाटील, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, ‘भाजपा'चे विजय घाटे, डॉ. जयाजी नाथ, दीपक पवार, जनार्दन सुतार, दत्ता घंगाळे, संजय ओबेरॉय, राजेश राय, दर्शन भारद्वाज, पांडुरंग आमले तसेच इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान करण्यासाठी ‘महायुती'साठी लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. त्यासाठी ४००पारचे उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर ‘महायुती'चे उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. तसेच भविष्यात या भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल आणि प्रगती साधायची असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायला हवेत, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
‘महायुती'च्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन नागरिकांशी सवांद साधावा, असे आवाहन उपनेते विजय नाहटा यांनी यावेळी केले. तसेचपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने ‘महायुती'च्या उमेदवारासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने काम करण्याचे आदेश पक्षप्रमुखांनी दिले आहेत. त्यामुळे ‘महायुती'च्या उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करुन ठाणे मधून ‘महायुती'चे उमेदवार नरेश म्हस्के यांना निवडून आणण्याचे आवाहन विजय नाहटा यांनी केले.