केडीएमसी आयुवतांकडून डोंबिवली मधील नालेसफाईची पाहणी

कल्याण : केडीएमसी महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी डोंबिवली मधील नालेसफाईची ७ जून रोजी पाहणी केली. या पाहणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींबाबत मॅन्युअली आणि यंत्राद्वारे नालेसफाई त्वरित करण्याबाबत कंत्राटदारांना आयुवत जाखड यांनी सक्त निर्देश दिले. दरम्यान, येत्या आठवडाभरात पुन्हा पाहणी करुन नालेसफाई व्यवस्थित झाली आहे की नाही याची खातरजमा केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिली.

एमआयडीसी परिसरातील नालेसफाई एमआयडीसी आणि महापालिका यांच्याकडून करणे जरुरीचे आहे. सध्या तेथील नालेसफाई महापालिकाकडून सुरु आहे. नाल्यांचे बळकटीकरण करण्याबाबत ‘एमआयडीसी'ला कळविण्यात आले आहे. या नाल्यांमध्ये अनेकवेळा नागरिकांकडून कचरा टाकला जातो. त्यामुळे नाले प्रवाहित होण्यास अडथळा निर्माण होतो. यासाठी नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंड आकारण्याबाबतचे निर्देश आयुवत जाखड यांनी संबंधित स्वच्छता अधिकाऱ्यांना दिले.

केडीएमसी महापालिका क्षेत्रात ९७ कि.मी. लांबीचे ९५ मोठे नाले असून ३५० कि.मी. लांबीचे छोटे नाले (गटार) आहेत. महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कावेरी चौक येथील नाला, अभिनव विद्यालय जवळील नाला, डोंबिवली (पूर्व) रेल्वे स्थानक जवळील स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज, आयरे-भोपर रस्त्यावरील नाला, जुनी डोंबिवली रेती बंदर येथील नाला, आदि नाल्यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे डी.एफ.सी.सी.आय.एल. यांच्यामार्फत सुरु असलेल्या लोहमार्गाच्या कामांमध्ये महापालिकाडून सुचविलेल्या रस्ते, गटारे आदि कामांच्या सद्यस्थितीची पाहणी करुन सदरची कामे, सी डी वर्क त्वरित करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आयुवतांनी सूचना दिल्या.

आयुवत इंदु राणी जाखड यांच्या सदर नालेसफाई पाहणीप्रसंगी शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त रमेश मिसाळ, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, मनोज सांगळे, सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, संजयकुमार कुमावत, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, इतर अधिकारी-कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वृक्षारोपण, स्वच्छता कार्यक्रमांद्वारे नवी मुंबईत पर्यावरण दिन साजरा