नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान

नवी मुंबई :-  त्याग, समर्पण व सेवा भावनेतून “अंत्योदय” व सक्षम राष्ट्र निर्मितीच्या कार्यासाठी कटिबद्ध असलेला जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणून ओळखला जातो. गेली 10 वर्षे देशासाठी अहोरात्र काम करणारे व जनतेसाठी अत्यंत महत्वपूर्ण घेतलेले निर्णय व गेल्या दशकभरात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि गरीब कल्याणाकरिता केलेले काम हे देशाने अनुभवले आहेत. त्याच बरोबर विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान केल्याबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी 151 बेलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख निलेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसमवेत मोठ्या आनंदोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. तसेच मोदीजी........मोदीजी..... भारतीय जनता पार्टीचा विजय असो... अशा घोषणांनी संपूर्ण परिसर मोदीमय झाला होता.  

यावेळी निलेश म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक अशोक गुरुखे, दि.ना.पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ता गोपाळराव गायकवाड, प्रभाकर कांबळे, तनसुख जैन, नवी मुंबई व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद जोशी, चंद्रकांत पाटील, विज्ञान म्हात्रे, ज्योती पाटील, चंदकांत कोळी, अजय पासवान, जयराम पासवान, लैला चव्हाण, आरती राऊल, शीतल जगदाळे तसेच भाजपा पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

विधान परिषदेच्या शिक्षक - पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक