म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
नव्या वर्षात मनुष्यबळासह २ हजार सीसी केमेर्याच्या माध्यमातून राहणार नजर- सह आयुक्त दत्ता कराळे
नव्या वर्षात मनुष्यबळासह २ हजार सीसी केमेर्याच्या माध्यमातून राहणार नजर-सह आयुक्त दत्ता कराळे
ठाणे : नव्या वर्षाच्या जल्लोषाकरिता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ठाणे पोलीस सज्ज असून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत पोलीस मनुष्यबळ अगदी सह आयुक्त ते शिपाई पर्यंत सर्वच रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे. त्याचप्रमाणे जल्लोषावर २ हजार सीसीटीव्ही केमेर्यांची नजर राहणार आहे.
नव्या वर्षाच्या स्वागतापूर्वीच ठाणे पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन ऑलआउट मध्ये २१५ पोलीस अधिकारी आणि १ हजार ६७ पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून १६ अवैध शस्त्र धडक कारवाई करीत हस्तगत केली. तर दारूच्या ७८ आणि जुगाराच्या २४, अमली पदार्थाच्या ७९ केसेस, दाखल करून अनेक आरोपीना बेड्या ठोकण्यात आल्या. तर पोलिसांच्या अभिलेखावर असलेल्या ५५५ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. तसेच ३७३ आस्थापनांची तपासणी कार्नाय्त आलेली आहे. या ऑपरेशनमध्ये ३७६ जणांवर कारवाई केली.
पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स, बारला परवानगी
नव्या वर्षाच्या जल्लोषाला शासनाने जल्लोषात ३१ डिसेंबर, २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाची परवानगी देण्यात आलेली आहे. तर शाकाहारी हॉटेल्स, परमिट रूम ,रेस्टोरंट, ऑर्केष्ट्रा बार याना ३१ डिसेंबर, २०२३ रोजी रात्री १-३० ते १ जानेवारी, २०२४ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत चालविण्यास अपर्वांगी देण्यात आलेली आहे. बंदोबस्तात मुख्यालय, विशेष शाखा, वाहतूक शाखा, जलद प्रतिसाद पथक,अतिक्रमण विरोधी पथक, एसआरपीएफ, आदींचा समावेश आहे. तर गर्दीच्या ठिकाणी, चौक, रस्ते, याठिकाणी नाकाबंदी, महिला आणि मुलींची छेडछाड, विनयभंग, सोनसाखळीचे गुन्हे आदी प्रकारांवर साध्या वेशातील पोलीस पथकांची करडी नजर राहणार आहे.
ड्रोन-सीसीटीव्हीची राहणार नजर
ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील पाच परिमंडळात बसविण्यात आलेल्या २ हजार सीसीटीव्ही केमेरे आणि खाजगी सीसीटीव्ही केमेरे यांच्या माध्यमातून ठाणे पोलीस विशेष संभावित ठिकाणी करडी नजर ठेवणार आहेत. तर वाहतूक पोलिसांनी नाकाबंदीचे नियोजन करून मद्य प्राशन करून वाहने चालविणाऱ्यावर धडक कारवाईची व्यूहरचना आखण्यात आलेली असल्याची माहिती सह आयुक्त दत्ता कराळे यांनी दिली.