मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
पनवेल मध्ये विविध स्पर्धांच्या माध्यमातून मतदार जनजागृती
पनवेल ः ‘लोकसभा निवडणूक-२०२४'च्या पार्श्वभूमीवर ३३-मावळ मतदारसंघांमध्ये स्वीप कार्यक्रमांतर्गत ४ एप्रिल रोजी खारघर मध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्वुÀलच्या वतीने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली. महापालिकेच्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयामध्ये निबंध स्पर्धा आणि शाळा क्र.४ येथे रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामोळे आणि चांगू काना ठाकूर विद्यालय-पनवेल येथील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून मतदानाचे महत्व पटवून दिले.
‘लोकसभा निवडणूक'च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांची (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम) अमंलबजावणी १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघ अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात केली जात आहे. पनवेल महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, स्वीप पथक प्रमुख अधिकारी, महापालिका मुख्य अभियंता संजय जगताप आणि गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबविले जात आहेत.
खारघर मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्वुÀल तर्फे ४ एप्रिल रोजी सायकल रॅली घेण्यात आली. या रॅलीची सुरुवात रामशेठ ठाकूर पब्लिक स्वुÀल पासून झाली. त्यानंतर शिल्प चौक, खारघर राजा मंदिर, नवरंग, शंकर मंदिर अशा मार्गाने रॅली मार्गस्थ झाली. या रॅलीमध्ये इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी मतदार राजा हो लोकशाहीचा धागा हो, वोट देने जाना है देश को आगे बढाना है, आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान, लढला नाहीस तरी चालेल पण मत देताना विकला जाऊ नकोस! अशा आशयाचे बॅनर्स सायकलला लावण्यात आले होते.
त्याचबरोबर चांगू काना ठाकूर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामोळे यांनी प्रभात फेरीचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत नागरिकांना मतदान करण्याविषयीचे आवाहन केले. याचबरोबर महापालिकेच्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयामध्ये निबंध स्पर्धा आणि शाळा क्र.४ येथे रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून मतदानाचे महत्व विद्यार्थ्यांनी पटवून दिले.