मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
इराणी टोळीचा सराईत सोनसाखळी चोरटा गजाआड
भिवंडी गुन्हे शाखा युनिट-२ ची कारवाई
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील भिऊवंडी अपरिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने धडक मोहीम राबवून ईराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोरटा अब्बास शब्बर जाफरी(२३) याला पोलीस ठिकाणे सापळा रचून अटक केली. त्याच्या अधिक चौकशीत तब्बल १९ गुन्ह्याची कबुली आरोपीने देत त्याच्याकडून २३ लाख ८९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ठाणे गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड याना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीच्या शांतीनगर परिसरात सापळा रचून ईराणी टोळीतील सराईत आरोपीस अटक केली. अटक केलेला आरोपी अब्बास शब्बर जाफरी (२३) रा. रूम नंबर १, पहीला माळा, अय्याज बिल्डींग, खान कंम्पाउंड, मुंजा बिल्डींगच्या बाजुला, शांतीनगर, भिवंडी, जि. ठाणे याला ३ जानेवारी रोजी ३ जानेवारी, २०२४ रोजी १० वाजण्याच्या सुमर्स अटक केली. त्याच्या अधिक चौकशीत आरोपीने ठाणे पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरी सह मोटार सायकल चोरी व मोबाईल फोन चोरीचे दाखल असलेल्या १९ गुन्ह्याची उकल करण्यात आली. त्याच्यावर नारपोली, भिवंडी शहर, बदलापूर पूर्व, हिललाईन, कापूरबावडी, वर्तकनगर, कासारवडवली, मध्यवर्ती पोलीस ठाणे, चितळसर , कासारवडवली, वागळे, महात्मा फुले पोलीस ठाणे, खडकपाडा आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलीस पथकाने ३०६ ग्राम वजनाचे २३ लाख ८९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश लाभले. अटक आरोपी अब्बास शब्बर जाफरी याच्यवर विविध पोलीस ठाण्यात १९ गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाची कारवाईने सोनसाखळी करणाऱ्या ईराणी टोळीची दाणादाण उडाल्याचे चित्र आहे.