वाहतुकीचे नियम पाळा आणि दंड टाळा

नवी मुंबई : कोपरखैरणे वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम पाळा आणि दंड टाळा या मोहिमेअंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहन चालका विरोधात विशेष मोहीम राबवून वाहतुकीचे नियम मोडणाऱया 860 वाहनांवर कारवाई केली. त्याशिवाय वाहतुक पोलिसांनी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये, रिक्षा चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. तसेच ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर देखील कारवाई केली.  

नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडुन वाहतुकीचे नियम पाळा आणि दंड टाळा या मोहीमेअंतर्गत 1 ते 15 मार्च या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांच्या सुचनेनुसार राबविण्यात आलेल्या या मोहीमेत वाहतूक पोलिसांनी शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन त्यांना व त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले.  

तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती त्यांना देण्यात आली. त्याचप्रमाणे रिक्षा युनियन चालक-मालक संघटना, स्कूलबस चालक-मालक संघटना यांच्या देखील बैठका घेऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच प्रत्येक सिग्नलवर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांकडुन वाहतूक नियमन करण्याबरोबरच बेशिस्त वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवडÎात वाहतुक पोलिसांकडुन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडणाऱया 860 वाहनांवर कारवाई करण्यात आली.  

या कारवाईत सिग्नल जम्पिंग-6, वाहन चालवताना मोबाईल संभाषण करणे -10, रिक्षातून ज्यादा पॅसेंजर वाहतूक करणेö57, मद्यप्राशन करुन वाहन चालवणे -10, वीना हेल्मेट दुचाकी चालवणेö248, रहदारीस अडथळा करुन वाहन पार्क करणे -298, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणेö5, फुटपाथवरुन वाहने चालवणे -112, स्टॉप लाईनवर वाहने न थांबवणेö38 अशा वाहतूकीचे नियम मोडणाऱयांवर एकुण 860 वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी दिली.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 आ. मंदाताई म्हात्रे यांनी साजरी केली महिलांसोबत धुळवड