शरद पवार यांनी घेतली कलानी कुटुंबियांची भेट
डोंबिवली ः कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर मध्ये अनेक वर्षापासून कलानी यांनी ‘राष्ट्रवादी'ची जागा राखली होती. ज्योती कलानी यांनी अनेक वर्ष हीच जागा आपल्या जवळ ठेवली होती. मात्र, कुमार एलानी यांनी ‘भाजपा'कडून निवडणूक लढवून उल्हासनगरवर कमळ फुलविले होत. त्यासाठी ‘भाजपा'चे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अथक प्रयत्न केले होते. ‘राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी'ला आपली जागा गमवावी लागल्याने आता ती जागा पुन्हा आपल्याकडे यावी याकरिता पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार कलानी यांच्या भेटीला आले. या भेटीला राजकीय दृष्टीकोनातून आणि सध्या कल्याण पूर्वेतील घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
‘राष्ट्रवादी'ला शह देण्यासाठी ‘शिवसेना'ने देखील कंबर कसली असून त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आयोजित केला होता. त्यामुळे कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर येथे भगवे वातावरण दिसले. उल्हासनगर येथे शरद पवार यांच्या दशहरा मैदानात पार पडलेल्या ‘एल्गार परिषद'मधून फुले, आंबेडकरी चळवळीतील अनेकांचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसले. त्यामुळे आगामी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ‘इंडिया आघाडी'चा उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा असेल? ते अद्याप गुलदस्त्यात असले तरी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतर कल्याण मतदारसंघ राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. कलानी आणि राष्ट्रवादी यांच्यात राजकीय मतभेद नसून १३ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीने ‘महायुती'मध्ये कल्याण मतदारसंघ आपल्याकडे कसा राखला जाईल? याकरिता प्रयत्न सुरु आहे.