मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
नवी मुंबई मधील ५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मार्च २०२४ अखेर ५ प्राथमिक शाळा शासनाची आणि नवी मुंबई महापालिकेची मान्यता न घेता अनधिकृतपणे चालवित असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ५ अनधिकृत शाळांची यादी महापालिकेच्या वतीने प्रसिध्द करण्यात येऊन सदर अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
आर.टी.ई. अधिनियम २००९ मधील कलम-१८ अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. त्यामुळे संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महानगरपालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे. तसेच परवानगीशिवाय सुरु केलेली शाळा तात्काळ बंद करावी. अन्यथा आपणाविरुध्द बालकांचा मोफत-सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवी मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, सदर अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत. तसेच ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करुन नजिकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा. जेणेकरुन पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असेही महापालिका तर्फे सूचित करण्यात आले आहे.
संस्थेचे नांव शाळेचे नांव-पत्ता माध्यम
इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई अल मोमीन स्कुल, आर्टिस्ट व्हिलेज, सेक्टर-८ बी, सीबीडी इंग्रजी
ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, आग्रीपाडा. इकरा ईस्लामिक स्कुल ॲण्ड मक्तब, सेक्टर-२७, नेरुळ इंग्रजी
आटपती एज्युकेशन ट्रस्ट, सीवुडस् ऑर्कडिस् इंटरनॅशनल स्कुल (CBSE), सेवटर-४०, सीवुडस् इंग्रजी
इलिम फुल गोस्पेल ट्रस्ट, ऐरोली इलिम इंग्लिश स्कुल, आंबेडकर नगर, रबाले इंग्रजी
मारानाथ संस्था शालोम प्रि प्रायमरी स्कुल, शिवशक्तीनगर, तुर्भे स्टोअर्स इंग्रजी