मतदान जनजागृती पथनाट्याला रानसई आदिवासी मतदार बंधू-भगिनींचा चांगला प्रतिसाद

उरण : भारतीय निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग, तहसील कार्यालय उरण व पंचायत समिती उरण शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित नवीन शेवे केंद्रातील शिक्षक बंधू भगिनींनी गटशिक्षणाधिकारी सौ प्रियांका म्हात्रे  यांच्या मार्गदर्शनाखाली सुत्रधार मच्छिंद्र म्हात्रे, किशोर पाटील लिखित/दिग्दर्शित मतदान जनजागृती पथनाट्य २६ रोजी रानसई येथे चारीवाड्यांच्या आदिवासी मतदार बंधू भगिनींसमोर सादर करण्यात आले. या पथनाट्याला उपस्थित आदिवासी बंधू भगिनी मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला.

पथनाट्य कलाकारांनी मतदान जनजागृती साठी आपापल्या भूमिका उत्तम प्रकारे वठवून लोकांना मतदान करण्याचे महत्त्व पटवून दिले. मतदारांच्या हातात वेगवेगळे बॅनर देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. या कार्यक्रमास पंचायत समिती उरण शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी  प्रियांका म्हात्रे, ज्योती ठाकूर, ग्रुप ग्रामपंचायत रानसईच्या  सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व गावातील मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते. या पथनाट्यामध्ये विविध भूमिका बजावणारे नवीन शेवे केंद्रातील किशोर पाटील, महेंद्र  गावंड, नरेश म्हात्रे, विश्वनाथ पाटील, संजय होळकर, शिवप्रसाद पंडित, सौ. संगिता मेहत्रे, सौ.शर्मिला गावंड, सौ. प्रमिला गावंड, सौ. रूपाली पाटील, हार्मोनियम साथ देणारे रमण पंडित, ढोलकी वादक देविदास पाटील यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून मतदान जनजागृतीपर उद्बोधक पथनाट्य सादर केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आंबिवली-मुरबाड नवीन रेल्वे मार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा