मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
दिवाळे गावातील मच्छीमारांसाठी आधुनिक जेट्टी, काँक्रीट रॅम्प
नवी मुंबई : बेकायदा बांधकामांच्या हव्यासापोटी नवी मुंबईतील अनेक गावांचा उकीरडा झालेला असताना उत्तर बाजुस समुद्रकिनारी असलेले एकमेव मच्छीमार बांधवांचे गाव म्हणजे दिवाळे गांव, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या विविध सेवा-सुविधांमुळे कात टाकत आहे.
दिवाळे गावातील स्थानिक मच्छीमार बांधवांसाठी आजपर्यंत आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून ५ आधुनिक जेट्ट्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच सन २००४ साली ‘विधान परिषद'ची आमदार म्हणून धुरा हाती घेतल्यावर पहिली छोटी जेट्टी स्थानिक डोलकर मच्छीमार बांधवांसाठी आमदार विकास निधीमधून ५ लाख रुपये खर्चातून बांधून देण्यात आली. त्याच जेट्टीचे आज १० कोटी रुपये खर्च करुन मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आधुनिक पध्दतीने नुतनीकरण करुन बांधलेल्या जेट्टी आणि
काँक्रीट रॅम्पचे उद्घाटन ११ मार्च रोजी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच गावातील कै. उषा शनिवार कोळी, कै. काशीबाई गंगेश कोळी, कै. हिरा पदा कोळी यांच्या स्मरणार्थ या जेट्टीवरील फलकावर त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याकाळी ‘जेट्टी'चा अनुभव नसल्यामुळे छोटी जेट्टी उभारण्यात आली होती.
परंतु, कालांतराने जेट्टी विषयक संपूर्ण माहिती घेण्यात आली, तेव्हा फगेवाले आणि खांदेवाले येथे भव्यदिव्य अशी जेट्टी उभारण्यात आली. तेव्हा सदर सर्व सुधारणांचा अवशेष घेऊन डोलकर मच्छिमार बांधवांकरिता आधुनिक पध्दतीने जेट्टी बांधण्यात आली आहे. या जेट्टी करिता महाराष्ट्र शासनाने सुमारे १० कोटी रुपयांचा निधी खर्च करुन सर्व सुविधायुक्त उपलब्ध करुन दिल्या आहेत. नव्याने निर्माण होत असलेल्या ‘'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' समोरच सदर जेट्टी असल्याने येथील स्थानिक मच्छिमार बांधवांना व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. एकंदरीतच मच्छीमार सुखी झाले तर आम्हीही सुखी होणार, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनीसांगितले.
दिवाळे कोळीवाड्याचे श्रध्दास्थान असलेल्या श्री बहिरीदेव आणि या देवाचा दिवाळीच्या सणात गावात साजरा होणारा उत्सव हीच ‘बेलापूर'च्या कुशीत असणाऱ्या दिवाळे कोळीवाड्याची खरी ओळख आहे. आज याच श्री बहिरीनाथ देवस्थानासाठी आमदार निधीतून ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. या निधीतून खांदेवाले मच्छिमार जेट्टीसमोर भाविकांसाठी भव्यदिव्य सभामंडप बांधण्यात येणार आहे. तसेच मंदिरात भाविकांकरिता आसन व्यवस्था, पाणपोई, शौचालय अशा विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारत देशातील संपूर्ण गावांचे ‘स्मार्ट व्हिलेज'चे स्वप्न तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘गांव दत्तक योजना'च्या अंतर्गत दिवाळे गांव दत्तक घेऊन या गावाचा पूर्ण कायापालट करुन टाकला आहे. नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गांवाचे नाव दिल्ली पर्यंत घेऊन जाण्याचा मानस असल्याचे आमदार सौ. म्हात्रे व्यवत केला आहे.
याप्रसंगी विकास सोरटे, ‘बलापूर व्यापारी संघ'चे अध्यक्ष प्रमोद जोशी, ‘फगवाले मच्छीमार संस्था'चे अध्यक्ष अनंता बोस, ‘डोलकर मच्छीमार संस्था'चे सदस्य तुकाराम कोळी, ‘जेष्ठ नागरिक संस्था'चे अध्यक्ष चंद्रकांत कोळी, संतोष कोळी, समाजसेवक कुमार कोळी, पांडुरंग कोळी, ‘छाया कला सर्कल'चे सदस्य श्याम कोळी, ‘श्री साई कला सर्कल ब्रास बॅण्ड'चे अध्यक्ष अक्षय कोळी, सुभाष गायकवाड, प्रताप भोसकर, रामकृष्ण अय्यर, समाजसेविका ज्योती पाटील, प्रियांका म्हात्रे, ‘बेलापूर राम मंदिर'चे
अध्यक्ष चंद्रकांत पाटील, खेळाडू तसेच दिवाळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळे गावाला जेवढ्या सोयी-सुविधा देता येतील, त्या देण्याचा प्रयत्न करणार आहे. दिवाळे गांवच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्मार्ट व्हिलेज अंतर्गत भव्य, सुसज्ज सर्व सुविधांयुक्त मच्छी मार्केट, भाजी-फळ मार्केट, मटन मार्केट, सुसज्ज शाळा, उद्यान, मासे सुकविण्यासाठी प्लॅटफॉर्म, स्टेज, समाज मंदिर, रिंगरोड, स्वाध्याय हॉल, प्रसाधनगृहे, लहान मुलांकरिता खेळणी, विरंगुळा केंद्र, गजेबो गार्डन, बहुउद्देशीय इमारत, ओपन जिम, चारचाकी वाहनतळ यासह परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. याकरिता आमदार निधीची तरतूदही करण्यात येणार आहे. दिवाळे गांव स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. चांगले शिक्षण, आरोग्य सुदृढ होण्यास मदत मिळणार आहे. स्वच्छता आणि सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.