सन्मान नवी मुंबईच्या लेकींचा!

‘भाजपा महिला मोर्चा'तर्फे महिला पत्रकार, शिक्षकांचा सत्कार

नवी मुंबई : सावित्रीमाई फुले जयंती (जानेवारी), पत्रकार दिन (६ जानेवारी), राजमाता जिजाऊ जयंती (१२ जानेवारी) या दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई मधील महिला पत्रकार आणि शिक्षिका यांचा सन्मान तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नवी मुंबई महापालिका समाज कल्याण विकास विभाग तर्फे महिलांसाठी विविध प्रकारच्या कोर्सेसचे प्रमाणपत्र वितरण ‘भाजपा'च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा प्रा. वर्षा भोसलेे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमात महिला पत्रकार मोनिका भोसले, प्रिया भुजबळ, स्वप्ना हरळकर, संध्या श्रीवास्तव, अश्विनी जैतपाल यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना मुद्रा लोन विषयक सविस्तर मार्गदर्शन, महापालिका समूह संघटकांकडून बचत गटाबाबत मार्गदर्शन, आरोग्य विषयक माहिती, आभा कार्ड वितरण तसेच इतर शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात आली.

याप्रसंगी नवी मुंबई महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, सावित्रीबाई फुले राज्यस्तरी पारितोषिकप्राप्त आदर्श शिक्षिका तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित माजी मुख्याध्यापिका मनिषा अंधारे, ज्येष्ठ समाजसेविका जयश्री दंडवते, समाजसेवक जयेंद्र सुतार, प्रभाकर ठाकूर, संदीप पाटील, ‘भाजपा महिला मोर्चा'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, महामंत्री आशा शेगदार यांच्यासह इतर मान्यवर तसेच महिला पदाधिकारी-कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू'ची पाहणी