मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ववतव्य
‘शिवसेना (उबाठा)'तर्फे वाशी पोलिसांकडे मागणी
नवी मुंबई : सार्वजनिक ठिकाण असलेल्या वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभा घेऊन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि संतापजनक ववतव्य करणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘शिवसेना'च्या वतीने वाशी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन ‘शिवसेना'चे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वाशी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांना दिले आहे.
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी ११ जुलै रोजी दुपारी ४ च्या सुमारास वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी नरेंद्र पाटील यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'चे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत संतापजनक, आक्षेपार्ह आणि चिड आणणारे ववतव्य केले आहे. नरेंद्र पाटील यांच्या या चिथावणीखोर ववतव्यामुळे तमाम शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे सदर प्रकाराची दखल घेऊन नरेंद्र पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘शिवसेना'तर्फे वाशी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
यावेळी वाशी पोलिसांना निवेदन देताना ‘शिवसेना'चे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासमवेत जिल्हा संघटक सौ. रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, संतोष घोसाळकर, सुमित्र कडू, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख समीर बागवान, महेश कोटीवाले, गणेश घाग, विशाल ससाणे, मनोज इसवे, आदि पदाधिकारी उपस्थित होते.