ठेकेदाराच्या हलगर्जीपणा; लाखो लिटर पाण्याची नासाडी

वाशी : महापे औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसी मार्फत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. मात्र, सदर कामावेळी खोदकाम करताना ठेकेदारामार्फत येथील पाण्याच्या जलवाहिनीला मार बसून ती फुटली. परिणामी, सदर ठिकाणी लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.

औद्योगिक क्षेत्रातील ए ब्लॉक आणि ई एल ब्लॉक मध्ये एमआयडीसी मार्फत १५ किलोमीटर गटार आणि रस्ता काँक्रिटीकरणाचे काम देण्यात आले आहे. सदर काम खाजगी ठेकेदाराकडून करण्यात येत असून या कामानिमित्त ठेकेदार मार्फत या ठिकाणी खोदकाम सुरु आहे. मात्र, २५ मार्च रोजी गुप्ता वजन काट्यासमोर रस्तावर खोदकाम करताना येथील जलवाहिनीला मार बसला आणि ती फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.


एमआयडीसी भागात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने येथील काही कारखान्यांना टँकरच्या पाण्याचा आसरा घ्यावा लागतो. त्यात अशी जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असल्याने कारखानदारांनी चिंता व्यक्त केली आहे. सदर जलवाहिनीचे काम २५ मार्च रोजी रात्री उशीरा पर्यंत करण्यात आले असून याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महापे एमआयडीसी ए ब्लॉकचे सहाय्यक अभियंता दिपक राऊत याच्याशी संपर्क साधला असता त्यांचा प्रतिसाद लाभला नाही. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘आयुक्त आपल्या दारी' अभियान सुरु करण्याची मागणी