मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
शासनाकडून नव्याने आरटीई २५ टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु
नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागील वर्षाप्रमाणे सन २०२४-२५ या वर्षासाठी दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विना अनुदानित) आणि महापालिकेच्या (स्वयं अर्थसहाय्यित शाळा) शाळांमध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्केसाठी प्रवेश घेता येणार आहे. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकांच्या पालकांना पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे.
सन २०२४-२५ या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी यापूर्वी १७ एप्रिल ते १० मे २०२४ पर्यंत बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी आरटीई अंतर्गत २५ टक्के साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत नवी मुंबई महापालिकेमध्ये एकूण ९८ पात्र शाळा आहेत.
दरम्यान, यापूर्वी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जाचा सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. त्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांना पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे. शासन वेबसाईटवर १७ ते ३१ मे २०२४ पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे, आदिंबाबत सर्व माहिती शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून pooje://eulahu.sippiepui.udn.gh/isnjdiwit/leeye/yuangharenhou. या वेबसाईटवर १७ ते ३१ मे २०२४ पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे इत्यादींबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यापूर्वी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जाचा सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नसल्याने सन २०२४-२2५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांना पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे.
सदर प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या (वंचित गट-एससी/एसटी/एलटी/व्हीजे/ओबीसी/एसबीसी, दुर्बल गट-एक लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग-बालकाचे ४० टक्के अपंगत्व, एचआयव्ही बाधित किंवा एचआयव्ही प्रभावित बालके, अनाथ बालके) जास्तीत जास्त पालकांनी या प्रवेश प्रक्रियेत आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करुन सदर सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन असे आवाहन नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. -योगेश कडुस्कर, उपायुवत-शिक्षण विभाग, नवी मुंबई महापालिका.