ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
‘आरोग्य वर्धिनी केंद्र'द्वारे अल्पशा दरात आरोग्य सेवा
डोंबिवली : नागरिकांना ‘आरोग्य वर्धिनी केंद्र'च्या माध्यमातून अल्पशा दरात म्हणजे १ रुपयामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. सदर २ केंद्रांचे भूमीपुजन युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डोंबिवली स्टेशन परिसर सुशोभिकरणाचे आणि लोकोपयोगी कामांचे भूमीपुजन देखील करण्यात आले.
याप्रसंगी युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांच्यासह डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगसेवक जयेश म्हात्रे, डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण, शाखप्रमुख सचिन म्हात्रे, विभाग संघटक कोयेंडे, उपशहरप्रमुख दिनेश शिवकलर, गजानन व्यापारी, संतोष कळाशिलकर, शाखाप्रमुख तुषार शिंदे, धनाजी चौधरी, रिक्षा चालक मालक युनियन डोंबिवली शहर उपाध्यक्ष अर्जुन माने, लक्षण यादव, जयदास मोरे, महेंद्र सोरटे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमांतून विविध विकास कामांचे भूमीपुजन होत आहे. ‘आरोग्य वर्धिनी केंद्र'च्या २ केंद्रांचे भूमीपुजन तसेच स्टेशन सुशोभिकरणाचे भूमीपुजन झाले आहे. ‘आरोग्य वर्धिनी केंद्र'च्या माध्यमातून नागरिकांना १ रुपयात आरोग्याच्या सेवा मिळणार आहेत. तसेच ओपीडी आणि औषध सुविधा देखील मोफत मिळणार आहेत. त्याचबरोबर स्टेशन सुशोभिकरणाचे काम देखील सुरु करण्यात आले आहे. डोंबिवली शहरातील ३ लाखाहून अधिक नागरिक दररोज ‘रेल्वे'ने प्रवास करतात. स्टेशन बाहेर आल्यावर सुसज्ज, स्वच्छ आणि सुंदर दिसावे याकरिता मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘डीप वलीन'च्या माध्यमातून जी मोहीम राबविली आहे. या मोहिमेत यावेळी रिक्षा युनियनचे बरेच सहकार्य करणार आहेत, असे दिपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, मोठागाव सागरसृष्टी इमारत मधील आरक्षण क्रमांक-२५१-२५२, आनंदनगर रोड येथील सीताराम छाया इमारती मधील आरक्षण क्र.२२७ मध्ये ‘आरोग्य वर्धिनी केंद्र' सुरु करण्यात येणार आहे. तर सीएमएस शाळा ते ओम कॉम्प्लेक्स पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम स्टेशन परिसर सुशोभिकरण करण्यात येणार आहे.