मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
मोठी जुई-मोठे भोम रस्त्याची वर्षभरात दुरावस्था
उरण : दिघोडे ते चिरनेर या मार्गाला जोडणारा मोठी जुई ते मोठे भोम असा रस्ता एक वर्षाच्या आतच उखडला गेल्याने प्रवाशांना उखडलेल्या, खड्डे युक्त रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे ‘रायगड जिल्हा परिषद'तर्फे रस्त्याच्या झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
‘रायगड जिल्हा परिषद'च्या माध्यमातून उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करण्यात येत आहेत. परंतु, ‘जिल्हा परिषद'मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे आणि बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे गावागावात करण्यात येत असणारी अनेक विकासकामे नित्वृÀष्ट दर्जाची होताना दिसत आहेत.
दिघोडे ते चिरनेर या मार्गाला जोडणाऱ्या मोठी जुई ते मोठे भोम या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले. या कामासाठी लाखो रुपयांचा निधी मागील वर्षी खर्च करण्यात आला होता. मात्र, कामात झालेल्या भ्रष्टाचारामुळे सदरचा रस्ता वर्षभरातच उखडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे दुरावस्था झालेल्याया रस्त्याचा त्रास पुन्हा वाहन चालक, प्रवाशी नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ‘रायगड जिल्हा परिषद'च्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.