‘अभय योजना'चा ठाणेकरांनी घेतला लाभ

११५ कोटींची थकबाकी वसूल

ठाणे  ः ठाणे महापालिका मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरु केलेले अभियान, थकबाकी वरील दंड माफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाने १५ जानेवारी पर्यंत ६१० कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. त्यात ११५ कोटी रुपयांच्या थकबाकीचाही समावेश आहे. १५ डिसेंबर पासून लागू करण्यात आलेल्या थकबाकीवरील दंडमाफीच्या ‘अभय योजना'लाही चांगला प्रतिसाद मिळाला असून ‘अभय योजना'च्या काळात ४८.६४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात मालमत्ता कर विभागास यश मिळाले आहे.

नागरिकांच्या प्रतिसादामुळे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६०० कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालेला आहे. गेल्यावर्षी या कालावधीपर्यंत ५६० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसूल झाला होता. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, मालमत्ता करातून मार्च-२०२४ पर्यंत एकूण ७९२ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  ठाणेकर नागरिकांनी मालमत्ता कर भरुन महापालिकेच्या आवाहनास दिलेल्या प्रतिसादाबद्दल आयुक्त अभिजीत बांगर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
काही करदात्यांनी अद्यापपर्यत आपला कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पध्दतीने मालमत्ताधारकांकडे पोहोचविण्यात आली असून विहित मुदतीत आपला मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. ठाणेकर घरबसल्या ऑनलाईन कर भरणा करु शकतात. त्यामुळे त्यांनी सदर सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.  

करदात्यांनी ‘अभय योजना'ला उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला आहे. पुढील १५ दिवस ५० टक्के दंडमाफीची सवलत सुरु राहणार आहे. मात्र, त्यानंतरच्या कालावधीत कर थकीत ठेवणाऱ्या करदात्यांविरुध्द मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उचलण्यात येईल. यामध्ये मोठ्या थकबाकीदारांपासून सुरुवात करुन कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल. शहर विकासात मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी वेळेत मालमत्ता कर भरण्याचे सामंजस्य नागरिकांनी दाखवून महापालिकेस सहकार्य करावे.
-अभिजीत बांगर, आयुवत-ठाणे महापालिका.

‘अभय योजना'चा पुढचा टप्पा...
जे करदाते १६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम ४१(१) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या ५० % रवकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम ४१(१) अन्वये आकारलेल्या शास्तीवर ५० % सवलत देण्यात येणार आहे. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यानी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल, अशा करदात्यांना सदरची योजना लागू असणार नाही.

प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे...
मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३०ते सायं. ५ तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच सर्व शनिवार सकाळी १०.३० ते दुपारी ४ आणि रविवार सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत कराचा भरणा करता येईल. त्याचप्रमाणे महापालिकेच्या ैैै.ूप्ीहाम्ग्ूब्.ुदन्.ग्ह या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच उददुत झ्ीब्, झ्प्दहाझ, झ्ीब्ऊस्, ँप्ग्स्ींज्ज् याद्वारे करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करु शकतात. तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी ‘अभय योजना'चा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.
तक्ता-१ (रुपये कोटींमध्ये)
कालावधी                              थकबाकी   मालमत्ता कर   एकूण कर
१ एप्रिल ते १४ डिसेंबर २०२३   ६७.०६     ३९५.६८       ४६२.७५
१५ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२४ ४८.६४      ९९.४७         १४८.११
  एकूण                                  ११५.७०    ४९५.१५      ६१०.८६
 
तक्ता-२ प्रभाग समिती निहाय वसुली (रुपये कोटींमध्ये)ः
प्रभाग समिती एकूण वसुली      टक्केवारी
उथळसर     ४०.५१ ७२%
नौपाडा कोपरी       ७९.११           ७६%
कळवा               २०.००           ५६%
मुंब्रा                  ३६.२०           ७५%
दिवा                  ३७.८१            ७३%
वागळे इस्टेट          २३.००             ६८%
लोकमान्य सावरकर २३.९०     ६३%
वर्तकनगर             ९१.७०       ७१%
माजिवडा मानपाडा  १९३.०१       ६९%
मुख्यालय              ६५.६१       ८५%
एकूण                 ६१०.८६      ७७ %

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शस्त्र प्रदर्शन'मध्ये बच्चे कंपनीपासून थोरांनी हाताळली शस्त्रे