महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
पलेमिंगो पक्ष्यांच्या मृत्युमागे प्रकाश प्रदुषण?
नवी मुंबई : नेरुळ येथे अनेक पलेमिंगोच्या मृत्यू आणि जखमी होण्याच्या कारणांमध्ये प्रकाश प्रदुषणाचे एक कारण असू शकते, असे प्राथमिक अभ्यासातून दिसून आले आहे.
दरम्यान, ठाणे मधील दवाखान्यात आणखी २ पलेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने आठवडाभरात मृत गुलाबी पक्ष्यांची संख्या १० झाली आहे. तर ५जखमी पक्ष्यांवर उपचार सुरु असल्याची माहिती ‘वन विभाग'च्या अधिकाऱ्यांनी दिली. सदर प्रकारानंतर मँग्रोव्ह सेल, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या पथकांनी २६ एप्रिल रोजी पर्यावरण प्रेमींसोबत डीपीएस पलेमिंगो तलावाभोवती फेरफटका मारुन पाण्याचा प्रवाह रोखणारे चोक पॉईंटस् तपासले. डीपीएस तलावाभोवती अचानक झालेल्या पलेमिंगोच्या मृत्युनंतर ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार आणि ‘सेव्ह पलेमिंगोज अँड मॅन्ग्रोव्ह समुह'च्या रेखा सांखला यांनी आवाज उठविल्यानंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने सदरची भेट दिली.
डीपीएस तलाव आणि पामबीच मार्गावरील पथदिवे बदलल्यामुळे पक्ष्यांची दिशाभूल होऊन काही प्लेमिंगो पक्षी रस्त्यावर उतरले असावेत आणि पहाटे उडताना काही पलेमिंगो पक्षी अडथळ्यांना आदळले असावेत, असे मत ‘बीएनएचएस'च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्राथमिक निरीक्षणात नोंदविले आहे.
खरेतर, जेट्टीच्या रस्त्यावर पलेमिंगो ‘सिडको'च्या अवाढव्य साईन बोर्डवर कोसळू लागल्यानंतर ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने प्रकाश प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी ‘सिडको'च्या सह-व्यवस्थापकीय संचालकांनी याची तत्काळ दखल घेत जेट्टीचा फलक आणि चौकट उखडून टाकण्याचे आदेश दिले होते. आता सदर ठिकाणी साईन बोर्ड अस्तित्वात नसल्यामुळे पक्षी कोसळण्यामागे दुसरे कोणतेही कारण स्पष्ट होत नाही, असे निरीक्षण ‘बीएनएचएस'चे उपसंचालक डॉ. राहुल खोत यांनी नोंदवले आहे. डॉ. राहुल खोत यांनी महापालिकेच्या अभियंत्यांना पामबीच रोड पासून डीएसपी शाळेच्या दिशेने आणि नंतर नेरुळ जेट्टी रस्त्याजवळील पॅच मधील दिवे बदलण्याची सूचना केली आहे.
पदपथांवरील विद्युत दिव्यांवरील (बल्ब) सावली ४५ अंशाच्या कोनात असावी. जेणेकरुन प्रकाश फवत खालच्या दिशेने वाहतो आणि बाजुकडे वाहत नाही.ज्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो, असेडॉ. खोत म्हणाले.
सदर पाहणीमध्ये ‘मँग्रोव्ह सेल-मुंबई'चे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या नेतृत्वाखाली ‘वन विभाग'च्या पथकाने डीपीएस तलावाजवळील सर्व प्रवेशद्वारांची तपासणी केली. वन अधिकारीन दीपक खाडे आपला अहवाल ‘मॅन्ग्रोव्ह सेल'चे प्रमुख तथा अतिरिवत मुख्य वन संरक्षक व्ही. एस. रामाराव यांना सादर करणार आहेत.
दुसरीकडे ‘वनशवती'चे संचालक स्टॅलिन डी. यांनी बंद केलेले पाण्याचे चॅनेलही अधिकाऱ्यांच्या तपासणी समुहाला दाखवले. डीपीएस तलावामध्ये यापूर्वी ‘वन विभाग'च्या अधिकाऱ्यांनी उघडलेले प्रवेशद्वार वेळोवेळी बंद केले जात आहेत. मुख्य अडथळ्यांपैकी एक डीपीएस पलेमिंगो तलावाच्या दक्षिणेकडील टोकाला अद्याप वापरात नसलेल्या नेरुळ जेट्टीसाठी रस्ता तयार करताना आहे. ‘सिडको'च्या ठेकेदारांनी बेपर्वाईने जलवाहिनी गाडली, अशी बाब यावेळी तपासणी पथकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
सदर प्रकाराचे गांभिर्य ओळखून ‘सिडको'ला निर्देश देण्यासाठी, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरावर हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पर्यावरणप्रेमी रेखा सांखला या माजी नगरसेविकानेत्रा शिर्के यांच्या मदतीने याबाबत नागरिकांच्या हरकती गोळा करत आहेत, अशी माहिती बी. एन. कुमार यांनी दिली.
दरम्यान, डीपीएस तलावातील ओलाव्याला अक्षरशः गुलाबी रंगात परत आणण्यासाठी भरतीच्या पाण्याचे अडथळे तातडीने दूर करण्यासाठी आम्ही महापालिका आयुवतांना आवाहन करीत आहोत, असे कुमार म्हणाले. तर ‘नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटी (एनएमईपीएस)'चे संदीप सरीन यांनी डीपीएस पलेमिंगो तलाव स्थलांतरित पक्ष्यांसाठी अनाकर्षक बनवण्याच्या पर्यावरणविरोधी हितसंबंधांच्या प्रयत्नांबद्दल चिंता व्यक्त केली.