‘सिडको अग्निशमन दल'तर्फे अग्निशमन विषयक जनजागृती

नवीन पनवेल : कराची येथून मुंबई बंदरात आलेल्या फोर्ट स्ट्रीकीन नावाच्या
बोटी मध्ये स्फोटकांचा स्फोट होऊन १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात
प्रचंड मोठी आग लागली होती. सदरची आग विझवताना अग्निशमन दलातील ६६ हुन
अधिक जवान धारातीर्थी पडले होते. अशा प्रकारच्या दुर्घटनांची पुनवृत्ती
टाळण्यासाठी अग्निशमन या विषयाची जनजागृती करण्याकरिता १४ ते २० एप्रिल
या दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह संपूर्ण देशात पाळला जातो.

यंदा २०२४ च्या ‘अग्निशमन सेवा सप्ताह'करिता केंद्र शासनातर्फे ‘अग्नि
सुरक्षा सुनिश्चित करा, राष्ट्र उभारणीत योगदान भरा' असे घोषवाक्य अंतिम
करण्यात आले आहे. घोषवाक्य विविध सार्वजनिक ठिकाणी ‘सिडको'च्या अग्निशमन
विभागामार्फत लावण्यात आले. तसेच ‘सिडको'चे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय
राणे, उप मुख्य अग्निशमन अधिकारी प्रविण बोडखे आणि अग्निशमन केंद्र
अधिकारी प्रतिक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सप्ताह कालावधीत
जनजागृती कार्यक्रम, मॉकड्रिल घेण्यात आले. कळंबोली अग्निशमन केंद्र
येथे शहिद जवानांना श्रध्दांजली देवून ‘सप्ताह'ची सुरुवात करण्यात आली.

उलवे, सेवटर-९ येथील मेसर्स स्काय अव्हेन्यु या रहिवाशी इमारतीत जनजागृती
पर व्याख्यान आणि प्रात्यक्षिक देण्यात आले. उलवे, सेवटर-१० येथील मेसर्स
कामधेनु ऑकलॅण्ड या रहिवाशी इमारतीत जनजागृती पर व्याख्यान आणि
प्रात्यक्षिक देण्यात आले.

जासई येथील जिल्हा परिषद शाळेत उरण येथील मेसर्स ट्रान्स वर्ल्ड
लॉजिस्टीक वेश्वी येथे, मेसर्स जे. एम. बक्षी कंपनीमध्ये जनजागृती
कार्यक्रम घेण्यात आला. उरण येथील मेसर्स इंडियन ऑईल अदानी वेन्चर नवघर
येथे जनजागृती प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आले. उरण येथील मेसर्स
सेंट गोबीन वील कंपनी मोरा, येथे जनजागृती कार्यक्रम  घेण्यात आला.

कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटल येथे जनजागृती आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम
घेण्यात आले. नवीन पनवेल, सेवटर-५ येथील मेसर्स शंकरा आय हॉस्पिटल येथे
जनजागृती प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आले. खारघर, सेक्टर-२१ मधील
मेसर्स एम्पायर  इस्टेट को-ऑप. सोसायटी येथे मॉक ड्रील घेण्यात आले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

परवानगी न घेता निवडणूक विषयक पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, कमानी लावल्यास कायदेशीर कारवाई