सुदामा सोसायटी स्लॅब दुर्घटना प्रकरण

नवी मुंबई : वाशी, सेक्टर-२९ मधील सुदामा सोसायटीतील २०२ क्रमांकाच्या पलॅटचा हॉल मधील स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळल्याची घटना घडल्यानंतर वाशी पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेला संबंधित पलॅट मालक आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.  

वाशी, सेक्टर-२९ मधील सुदामा सोसायटीतील २०२ क्रमांकाच्या पलॅटमध्ये दुरुस्तीचे काम सुरु होते. सदर पलॅटच्या हॉलमध्ये नवीन लादी बसविण्यात येत असल्याने ५ एप्रिल रोजी कामगार सदर पलॅट मधील जुन्या लाद्या काढण्यासाठी मोठ्या हातोडयाने टॉईल्स तोडण्याचे काम करत होते. यामुळे सदर पलॅटच्या पलोरींगला हादरा बसल्याने पलॅटचा स्लॅब पहिल्या मजल्यावरील १०१ क्रमांकाच्या पलॅटवर कोसळला. सुदैवाने स्लॅब ज्या हॉलच्या ठिकाणी पडला, त्यावेळी तेथे कोणीही हजर नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाला नाही.  

या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात २०२ क्रमांकाच्या पलॅटमध्ये सुशोभिकरणाचे काम चालू असताना कॉन्ट्रॅक्टर करण कुमार बिसवाल याने योग्य ती सुरक्षिततेची काळजी आणि दक्षता घ्ोतली नसल्याचे आढळून आले. तसेच त्याने कामगारांच्या माध्यमातून मोठ्या हातोड्याने टॉईल्स तोडण्याचे काम केल्याने सदर पलॅट मधील पलोअरींगला हादरा बसून तो १०१ क्रमांकाच्या हॉलमध्ये कोसळल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे पलॅट क्रमांक १०१ मध्ये राहणाऱ्या कुटंुबियांची सुरक्षितता धोक्यात येऊन त्यांच्या घरातील किंमती वस्तुंचे नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यामुळे वाशी पोलिसांनी पलॅट क्रमांक २०२ चे मालक आणि कॉन्ट्रॅक्टर करण कुमार बिसवाल या दोघांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.  

 २३ ऑगस्ट २०२३ रोजी नेरुळ, सेक्टर-६ सारसोळे येथील तुलसी भवन या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब खालच्या मजल्यावर कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत २ जण ठार तर ४ जण जखमी झाले होते. तर ११ जून २०२२ रोजी नेरुळ, सेक्टर-१७ मधील जिमी पार्क या सहा मजली इमारतीच्या ए-विंग मधील सहाव्या मजल्यावरील हॉलचा स्लॅब एकावर एक असे तळमजल्यापर्यंत पत्त्याप्रमाणे कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता, तर ७ जण जखमी झाले होते. यानंतर आता वाशीमध्ये स्लॅब कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२ दशकांतच तुर्भे उड्डाणपुल पाडण्याची वेळ