ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
रांगोळी मधून भगवान श्रीरामाला मानवंदना
खारघर : अयोध्या येथे येत्या २२ जानेवारी रोजी श्री राम मंदिरात श्री रामाची मूर्ती स्थापन करुन प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यामुळे घर आणि विविध मंदिर परिसरात स्वच्छता करुन भगवान राम-सीता आणि लक्ष्मण यांची रांगोळी साकारली जात आहे. दरम्यान, रांगोळी कलाकाराने थर्माकोलला दगडाचे स्वरुप देवून त्यावर श्री रामाची रांगोळी काढलेले दगड पाण्यावर तरंगत असल्याचे दिसत आहे. या कलाविष्काराबद्दल या कलाकारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चुनाभट्टी येथे वास्तव्यास असलेले आणि खारघर परिसरात रिअल इस्टेटचा काम करणारे विलास पाटील रांगोळी कलाकार असून त्यांनी शिवाजी महाराज ते कचरा वेचक महिलांचे चित्र रांगोळीतून साकारले आहेत. दरम्यान, येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री राम मंदिरात भगवान रामाची मूर्ती विराजमान होणार असल्यामुळे विलास पाटील यांनी थर्माकोलला रांगोळीच्या दगडाचे स्वरुप देऊन त्यावर रांगोळीतून श्री रामाची मूर्ती साकारली आहे. विशेष म्हणजे सदर मूर्ती पाण्यात तरंगत असल्यामुळे रांगोळीचे कौतुक होत आहे.