बेलापूर येथील १४५ अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग तर्फे पंचशिल नगर, शाहबाज टेकडी, बेलापूर, येथील १४५ अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई २४ मे रोजी करण्यात आली.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील अे विभाग बेलापूर कार्यालय अंतर्गत पंचशिल नगर, शाहबाज टेकडी, बेलापूर येथे अनधिकृतपणे झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदं यांच्या निर्देशानुसार आणि उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार अे विभाग बेलापूर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणाखाली पंचशिल नगर, शाहबाज टेकडी, बेलापूर १४५ अनधिकृत झोपड्या अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन निष्कासित करण्यात आल्या आाहेत. या धडक कारवाईवेळी साठी बेलापूर अे विभाग कार्यालय मधील कनिष्ठ अभियंता मयुरेश पवार, वरिष्ठ लिपिक स्वप्निल तारमळे, लिपिक नयन भोईर यांच्यासह अधिकारी/कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस उपस्थित होते. सदर कार्यवाही करिता १५ मजूर, १ गॅसकटर, १ जेसीबी, १ पिकअप व्हॅन यांचा वापर करण्यात आला.

दरम्यान, महापालिका कार्यक्षेत्रात उभारण्यात आलेल्या अनधिकृत निष्कासित करण्याची कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे महापालिका उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डोंबिवली मधील स्फोटात २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू